fukrey 3 takes solid start on box office the vaccine war : शाहरुखच्या जवानचे वादळ थंडावल्यानंतर आता थिएटरमध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि प्रख्यात अभिनेते नाना पाटेकर यांचा द व्हॅक्सीन वॉर नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आहे. या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले असून त्यात कुणाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे यावरुन चर्चेला उधाण आले आहे. (लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर... फॉलो करण्यासाठी या लिंकवर करा क्लिक)
फुकरेच्या यापूर्वीच्या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी पसंती दर्शवली होती. त्याच्या तिसऱ्या चित्रपटाला अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. द कश्मिर फाईल्सचे दिग्दर्शक यांच्या व्हॅक्सीन वॉरची तुफान चर्चा होती. दरम्यानच्या काळात नानांनी प्रमोशनच्या निमित्तानं ज्या मुलाखती दिल्या होत्या त्यामुळे देखील त्याकडे वेगळ्या पद्धतीनं पाहिले जात होते. अशातच या चित्रपटाला मिळालेली ओपनिंग फुकरे ३ च्या तुलनेत कमी असल्याचे दिसते.
Also Read - Male Andropause: काय सांगता पुरुषांनाही येते रजोनिवृत्ती?
किंग खानचा जवान सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यातही प्रभाव टाकताना दिसतो आहे. त्या चित्रपटानं आतापर्यत सातशे कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. डिसेंबरमध्ये शाहरुखचा डंकी नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या आठवड्यात पाच चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. त्यात ओटीटीवरही मनोरंजनाची हमी त्या त्या ओटीटी प्लॅटफॉर्मनं दिली आहे. अशातच प्रेक्षक कोणता ऑप्शन निवडतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
फुकरे ३ आणि द व्हॅक्सीन वॉर हे दोन्ही चित्रपट गुरुवारी प्रदर्शित झाले आहेत. प्रेक्षकांना फुकरे ३ कडून मोठ्या कॉमेडीची अपेक्षा होती आणि हा चित्रपट त्या अपेक्षा पूर्ण करताना दिसत आहे. रिचा चढ्ढा, पुलकित सम्राट, पंकज त्रिपाठी यांच्या या चित्रपटानं पहिल्याच दिवशी आठ ते नऊ कोटींची कमाई केल्याचे दिसून येत आहे. आज तकनं दिलेल्या एका वृत्तानुसार, फुकरे हा चित्रपट देशभरातील अडीच हजारांहून अधिक स्क्रिन्सवर प्रदर्शित झाला आहे.
नाना पाटेकरांच्या द व्हॅक्सीन वॉर हा १३०० स्क्रिन्सवर प्रदर्शित झाला असून त्यानं पहिल्याच दिवशी एक कोटींपेक्षा अधिक कमाई केल्याचे दिसून आले आहे. या चित्रपटाचे जेवढे प्रमोशन झाले होते त्या तुलनेत त्याला मिळालेला प्रतिसाद कमी असल्याचे बोलले जात आहे. व्हॅक्सीन वॉरला अधिक कमाईसाठी एका प्रभावी व्हॅक्सीनची गरज असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.
२०१३ मध्ये आलेल्या फुकरे ने पहिल्याच दिवशी अडीच कोटींची कमाई केली होती. सरतेशेवटी ३६ कोटींची कमाई करुन प्रेक्षकांना सरप्राईज दिले होते. २०१७ मध्ये आलेल्या फुकरे रिटर्न्सला ८ कोटींची ओपनिंग मिळाली होती. त्यानं ८० कोटींची कमाई केली होती. त्यामुळे तिसऱ्या भागातही हा चित्रपट मोठी कमाई करेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.