Movie Review: 'फनरल'- 'आनंदी जीवनाचा जगण्याचा नवा मंत्र'
Marathi Movie: माणूस जन्मााला आल्यानंतर आपल्या सुखासाठी तो सातत्याने झटत असतो. आपल्या जीवनातील आनंद सदोदित राहावा याकरिता तो धडपडत असतो. आपले जीवन आनंदाने, आपल्या मर्जीने आणि समाधानाने तो जगत असतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तो आनंद शोधत असतो. कधी कधी हा (Marathi Movie Review) आनंद आपल्या शेजाऱ्या-पाजाऱ्यांबरोबर तसेच नातेवाईकांबरोबर शेअर करीत असतो. सुख आणि दुःख यांची बेरीज आणि वजाबाकी करीत तो आयुष्य मजेत घालवीत असतो आणि एके दिवशी तो या (entertainment news) जगाचा निरोप घेतो. आपल्या आनंदासाठी, सुखासाठी आणि समाधानासाठी झटणाऱ्या माणसाच्या आयुष्याचा शेवटही आनंदी व्हावा असा मूलमंत्र देणारा फनरल हा चित्रपट आता प्रदर्शित झाला आहे.
अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये या चित्रपटाचा गौरव झाला आहे. सामाजिक विषयावर भाष्य करणारा हा चित्रपट निर्माते रमेश दिघे (Marathi Film) आणि दिग्दर्शक विवेक दुबे यांनी बनविला आहे. हा चित्रपट खूप काही सांगणारा आणि मोलाचा संदेश देणारा असाच आहे. जगू आनंदे आणि निघू आनंदे....ही या चित्रपटाची टॅगलाईन बरेच काही सांगणारी आहे. या चित्रपटात (marathi actors) विजय केंकरे, आरोह वेलणकर, तन्वी बर्वे, संभाजी भगत, हर्षल शिंदे, पार्थ घाटगे, सिद्धेश पुजारे, प्रेमा साखरदांडे आदी कलाकारांनी काम केले आहे. हिरा (आरोह वेलणकर), सदा (सिद्धेश पुजारे), सूर्या ((हर्षद शिंदे) आणि विनोद (पार्थ घाटगे) या चाळीत राहणाऱ्या चौघा मित्राची ही कहाणी आहे.
हिराचे आई-वडील तो लहान असतानाच मरण पावलेले असतात. हिरा आणि त्याचे आजोबा (विजय केंकरे) एकत्र राहात असतात. अनेक ठिकाणी प्रयत्न करूनही हिराला नोकरी मिळत नाही. त्यामुळे साहजिकच त्याचे आजोबा त्याच्यावर सतत रागावत असतात. विनोद हा इन्शुरन्स एजंट असतो. परंतु त्यातही त्याला यश येत नसते. सूर्या हा डीजे रॅपर असतो. तर सदा हा उत्तम फोटोग्राफर असतो. या चौघांच्या हाताला काहीही कामधंदा नसल्यामुळे समाजाकडून तसेच कुटुंबाकडून त्यांची सतत हेटाळणी होत असते.त्यांच्यामध्ये हिरा हा सगळ्यात मोठा असतो. सततच्या होणाऱ्या या हेटाळणीमुळे तो पुरता वैतागलेला असतो. अशातच एके दिवशी त्याला एक व्यवसाय सुचतो आणि तो करायचाच असे तो ठरवितो. या व्यवसायाची कल्पना तो आपल्या अन्य मित्रांना देतो. त्यांनाही ती कल्पना कमालीची आवडते. परंतु तो व्यवसाय कोणता असतो...त्या व्यवसायात त्यांना यश येते का...हिराची प्रगती होते का...वगैरे प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल.
आयुष्याचा समरसून आनंद घेत असताना आयुष्याचा शेवट समाधानाने व्हावा हेच या चित्रपटात सांगण्यात आले आहे. माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो रडत येतो आणि सारं जग आनंदी होते. पण तो जेव्हा मरतो तेव्हा तो शांत होतो व सारे जग रडतं... आपल्या जीवनातील हे अंतिम सत्य असलं तरी मृत्यूचाही आपण सन्मान केला पाहिजे..सन्मानाने जगण्याबरोबरच मृत्यूचाही आनंदोत्सव साजरा केला पाहिजे....हेच सांगण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आला आहे. थोडक्यात जगू आनंदे निघू आनंदे...ही या चित्रपटाची टॅगलाईन बरेच काही सांगणारी आहे.
निर्माते रमेश दिघे आणि दिग्दर्शक विवेक दुबे यांनी एका सामाजिक महत्त्वाच्या विषयाला हात घातला आहे. चित्रपटाची कथा व मांडणी, संवाद तसेच कलाकारांचा अभिनय या जमेच्या बाजू आहेत. आरोह वेलणकर, हर्षद शिंदे, सिद्धेश पुजारे, तन्वी बर्वे, संभाजी भगत, पार्थ घाटगे आदी कलाकारांचा अभिनय उत्तम झाला आहे. चित्रपटाच्या कथेला उत्तम पटकथेची साथ लाभलेली आहे. त्यामुळे चित्रपट खिळवून ठेवणारा झाला आहे. चित्रपटाचा पूर्वार्ध हलकाफुलका असला तरी उत्तरार्ध गंभीर वळणारे जाणारा आहे. त्यामुळे काही ठिकाणी चित्रपटाची गती संथ झालेली दिसते. परंतु एकूणच आपल्या जीवनाचा योग्य असा मूलमंत्र सांगण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आला आहे.
*चित्रपट - फनरल
दिग्दर्शक - विवेक दुबे
रेटिंग - साडे तीन स्टार
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.