Tunisha Sharma च्या आत्महत्येनंतर कलाकार संघटनेचा मोठा निर्णय; म्हणाले,'आता निर्मात्यांवर सक्ती करणार...'

तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर मालिकांच्या सेटवर काम करणाऱ्या लोकांमध्ये दहशतीचं वातावरण दिसून आलं आहे,
fwice president bn tiwari reacts on tv actress tunisha sharma suicide case
fwice president bn tiwari reacts on tv actress tunisha sharma suicide caseGoogle
Updated on

Tunisha Sharma: तुनिषा शर्मा आता या जगात नाही..पण तिच्या निधनानंतर तिच्या मालिकेच्या सेटवर मात्र भीतीचं साम्राज्य पहायला मिळतंय. २७ डिसेंबरला तुनिषावर अंत्यसंस्कार पार पडले. तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर कलाकारांच्या सुरक्षेविषयी आता अनेक प्रश्न समोर उभे राहिले आहेत. अशात आता FWICE (फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिनेएम्पलॉई) नं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.(fwice president bn tiwari reacts on tv actress tunisha sharma suicide case)

fwice president bn tiwari reacts on tv actress tunisha sharma suicide case
Tunisha Sharma : शोकाकुल वातावरणात तुनिषा शर्मावर अंत्यसंस्कार

तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर FWICE चे अध्यक्ष बीएन तिवारी यांच्या मते, मनोरंजन इंडस्ट्रीच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडत असेल जेव्हा कोणत्या कलाकारानं सेटवरच आत्महत्येसारखं पाऊल उचललं. यामुळे चुकीचा समज पसरवला जाऊ शकतो. आणि या सगळ्याला ताबडतोब थांबवण्याची गरज आहे. आमच्या फेडरेशनच्या माध्यमातून यावर विचारपूर्वक ठोस निर्णय घेण्याची वेळ आता आलेली आहे.

fwice president bn tiwari reacts on tv actress tunisha sharma suicide case
Tunisha Sharma: तुनिषा अनंतात विलीन... मामांनी दिला मुखाग्नी

''फेडरेशन निर्माता संघटनांना एक लेटर पाठवणार आहे. म्हणजे अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडणार नाहीत. आता त्या मालिकेचा विचार केला तर..सेट जसा आहे तसा उभा आहे,पण अभिनेत्रीचं निधन झालं...अभिनेता जेलमध्ये आहे,शूटिंग थांबवली गेली..तो सेट मालिकाविश्वातला सगळ्यात महागडा सेट आहे, अशामध्ये निर्मात्याची काय परिस्थिती झाली असेल. याचा विचार नक्की व्हायला हवा. निर्माता संपून जाईल यातून बाहेर आला नाही पटकन तर...शूटिंगच थांबलं तर तो लोकांना कामाचे पैसे कसे देणार...त्याच्यावर किती कर्ज होईल..त्याचा काही हिशोब करता येणार नाही..सगळंच हाताबाहेर निघून जाईल''.

fwice president bn tiwari reacts on tv actress tunisha sharma suicide case
Tunisha Sharma Death Case : तुनिशाच्या अंत्यसंस्कारासाठी पोहचली शिझानची आई अन् बहिण, पाहा Video

बी.एन,तिवारी पुढे म्हणाले की-'' फेडरेशन याआधी देखील मालिकांच्या सेटवर जात होती. तिथे काम करणाऱ्या सर्वांशीच बातचीत करून परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करत होती. पण आज ती स्थिती राहिली नाही. आम्ही आता सेटवर जाणं बंद केलं आणि लोक मनमानी करताना दिसू लागले. तुनिषासोबत जे झालं ते खूपच दुःखदायक आहे. पण आता या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं..आणि असं काही पुन्हा घडणार नाही याची काळजी घ्यायला हवी. मेकरुममध्ये इतकी जागा नसते की कोणी आत्महत्या करेल. सेटवर इतके लोक असताना कोणालाच कसं काही कळलं नाही. लोकांना आता कोण काय करतंय याची पडलेली नाही''.

fwice president bn tiwari reacts on tv actress tunisha sharma suicide case
Bigg Boss 16: बिग बॉस ग्रॅन्ड फिनालेचा व्हिडीओ लीक? उर्वशी रौतेलाचा परफॉर्मन्स पाहून भडकले लोक..

यावर आता काय अॅक्शन घेतली जाईल याविषयी बोलताना तिवारी म्हणाले की, ''निर्मात्यांसोबतच्या मिटिंग दरम्यान आम्ही बोलणार आहोत की केवळ पैसा कमावणं हेच त्यांचे लक्ष्य नसायला हवं. आपल्या टीमचं मानसिक आरोग्य कसं चांगलं राहिल याकडेही त्यांनी लक्ष द्यायला हवं. मीटू प्रकरण सुरु झालं तेव्हा आम्ही सेटवर लैंगिक अत्याचारासारख्या गोष्टींकडे गांभीर्यानं लक्ष देण्यासाठी एक टीम बनवली होती. त्याप्रमाणेच आम्ही आता सेटवर काउंसलर ठेवण्याचा मुद्दा मांडणार आहोत. काउन्सिलिंग आजच्या धकाधकीच्या काळात खूप गरजेचं आहे. आज लहान वयात लगेच भरपूर पैसे मिळतात आणि मग मुलांना कळत नाही आयुष्यात त्याचा कसा योग्य वापर करायचा''.

fwice president bn tiwari reacts on tv actress tunisha sharma suicide case
Tunisha Sharma Death: तुनिषाचं पार्थिव पाहिलं आईला चक्कर आली, शोक आवरेना!

''प्रत्येक काउंसलरकडे कलाकारांची मेडिकल रिपोर्ट असायला हवी. तसंच त्यांना शूटिंगच्या वेळा आणि कलाकारांचा स्ट्रेस याविषयी देखील माहित असायला हवं. तुनिषाच्या या पावलानं आम्हाला खरोखरच घाबरवलंय. अशा भीतीच्या वातावरणात काम कसं होईल''.

''मला अली बाबा सेटवर काम करणाऱ्या अनेक लोकांचे फोन आले. त्यांना आता आपल्या भविष्याची चिंता आहे. एका सेटशी अनेक लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न जोडलेला आहे. त्यांच्यासोबत पुढे काय होणार आहे यासंदर्भात आम्ही आता निर्माता संघटनेसोबत बोलणार आहोत. कारण सध्यातरी मालिका आणि त्याच्याशी जोडलेल्या लोकांचं भविष्य अंधारातच दिसत आहे''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.