G20 Summit: ब्राझीलच्या राष्ट्रपतींवर RRR चा फिवर! तोंड भरुन केलं कौतुक तर राजामौलींनीही मानले आभार

G20 Summit 2023 Brazilian President Lula da Silva’s reveals his favourite Indian film is ‘RRR’  Director SS Rajamouli thanks
G20 Summit 2023 Brazilian President Lula da Silva’s reveals his favourite Indian film is ‘RRR’ Director SS Rajamouli thanksEsakal
Updated on

प्रसिद्ध साऊथ दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या आरआरआर या चित्रपटाची लोकप्रियता काही कमी नाही केवळ भारताच नाही तर या चित्रपटाने भारताबाहेरही आपल्या नावाचा डंका वाजवला आहे.

या चित्रपटाने केवळ जगभरात प्रशंसा मिळवली नाही तर ऑस्कर पुरस्कारही आपल्या नावे केला. मात्र आता पुन्हा राजामौली यांचा 'आरआरआर' हा चित्रपट चर्चेत आला आहे. त्याला कारण ठरलयं ते भारतात सुरू असलेली G20 शिखर परिषद.

त्याच झालं असं की, G20 शिखर परिषेत सहभागी होण्यासाठी आलेले ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ यांनी या चित्रपटाचे खुप कौतुक केले. हा चित्रपट त्यांना खुप आवडला असून या चित्रपटाने त्यांना मंत्रमुग्ध केल्याचंही त्यांनी सांगितलं. ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांनी चित्रपटाचे कौतुक करत चित्रपटातील कलाकार आणि क्रूचे अभिनंदन केले.

G20 Summit 2023 Brazilian President Lula da Silva’s reveals his favourite Indian film is ‘RRR’  Director SS Rajamouli thanks
Uorfi Javed Video: "शर्टात शर्ट गुलाबी शर्ट..", उर्फीची फॅशन पाहून नेटकरी थक्क! व्हिडिओ व्हायरल

यावेळी ते म्हणाले, "'RRR' ही तीन तासांची फिचर फिल्म आहे आणि या चित्रपटात सुंदर नृत्यांसह खरोखर फनी सीन्सही देण्यात आले आहेत. हा चित्रपट भारतीयांवरील ब्रिटिशांच्या नियंत्रणावर सखोल टीका करतो.

हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरेल असा माझा प्रामाणिक विश्वास आहे. कारण जो व्यक्ती माझ्याशी बोलतो, मी पहिल्यांदा त्याला म्हणतो की, आरआरआर हा तीन तासांचा चित्रपट पाहिला आहे का? त्यामुळे मी चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे आणि कलाकारांचे अभिनंदन करतो कारण त्यानी मला मंत्रमुग्ध केले."

G20 Summit 2023 Brazilian President Lula da Silva’s reveals his favourite Indian film is ‘RRR’  Director SS Rajamouli thanks
Pawan Kalyan : चंद्राबाबूंनंतर आता साऊथच्या एका बड्या अभिनेत्याला पोलिसांनी केली अटक, काय आहे कारण?

सध्या त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर 'RRR'चे दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त करत ब्राझीलच्या राष्ट्रपतींचे आभार मानले आहेत.

त्यांनी त्याच्या ट्विटमध्ये लिहिले की, 'सर @LulaOfficial. तुमच्या या अप्रतिम शब्दांबद्दल खूप खूप आभार. तुम्ही भारतीय सिनेमाचा उल्लेख केला आणि RRR चा आनंद घेतला हे जाणून आम्हाला खुप आनंद झाला!! आमची टीम खूप आनंदी आहे. आशा आहे की आमच्या देशात तुमचा खूप चांगला वेळ असेल. '

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.