Gadar 2 Naseeruddin Shah Comment on Sunny deol : बॉलीवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून सनी देओलच्या गदर २ ची मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. नुकतीच निर्मात्यांनी गदर २ च्या सक्सेस पार्टीचे आयोजनही केले होते. त्याला वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. बॉलीवूडचे तीन खान देखील यावेळी उपस्थित होते.
एकीकडे गदर २ वर कौतुकाचा वर्षाव होत असताना दुसरीकडे बॉलीवूडच्या एका ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अभिनेत्यानं सनीच्या गदर २ वर दिलेली प्रतिक्रिया मात्र खूपच नकारात्मक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्या अभिनेत्यावर नेटकऱ्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. नसिरुद्दीन शहा असे त्या अभिनेत्याचे नाव असून नेटकरी शहा यांच्यावर खूपच संतापले आहे.
Also Read - हॅप्पी हार्मोन...
तब्बल दोन दशकांच्या कालावधीनंतर प्रदर्शित झालेल्या गदर २ नं बॉक्सऑफिसवर मोठे विक्रम केल्याचे दिसून आले आहे. येत्या काळात या चित्रपटाचा तिसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. अशावेळी नसिरुद्धीन शहांनी दिलेली प्रतिक्रिया मात्र वेगळ्याच विषयाला तोंड फोडणारी ठरते आहे.
नसिरुद्धीन शहा काय म्हणाले?
एका मुलाखतीमध्ये नसिरुद्दीन शहा यांना गदर २ वरुन एक प्रश्न विचारण्यात आला होता. तो प्रश्न असा की, गदर २ च्या सक्सेसबाबत तुम्ही काय सांगाल? आता तुम्ही जर अंधभक्त होऊन काम करु लागलात तर आणखी काय सांगायचे, बोलण्यास काय जागाच उरली नाही. हे जे कुणी करत आहे त्यांना एका गोष्टींबाबत अंदाज नाही की, त्यांच्या अशा कृतीमुळे काय तोटा होणार आहे तो...
मी तुम्हाला सांगतो मी केरळ स्टोरी किंवा गदर २ हा चित्रपट पाहिलेला नाही. पण हे चित्रपट काय सांगतात, त्यांचा विषय काय आहे हे मला माहिती आहे. या चित्रपटांना यश मिळते याला आपण काय म्हणावे हेच कळत नाही. दुसरीकडे प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता, सुधीर मिश्रा, अनुभव सिन्हा यांच्या चित्रपटांना प्रेक्षक मिळत नाही याला काय म्हणावे, असा प्रश्न नसिरुद्धीन शहा यांनी उपस्थित केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.