Gadar 2 : 'तुम्हाला हल्क, सुपरमॅन चालतो मग तारासिंगच्या नावानं पोटात का दुखतं? गदरच्या सनीचा प्रश्न

गदरच्या भूमिकेसाठी मी खूप तयारी केली. आपल्या प्रेक्षकांना हॉलीवूडमधील वेगवेगळ्या कलाकृती आवडतात.
Gadar 2 Sunny Deol 11 August Released Hulk
Gadar 2 Sunny Deol 11 August Released Hulk esakal
Updated on

Gadar 2 Sunny Deol 11 August Released Hulk : सनीचा गदर २ प्रदर्शित होण्यास अवघ्या तीन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला असताना दुसरीकडे त्याच्या या चित्रपटाची मोठ्या प्रमाणावर चर्चा होताना दिसत आहे. तब्बल २३ वर्षांनी सनीच्या गदर या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित होणार असून सनी त्याचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे.

सनीनं पीटीआयशी बोलताना म्हटले आहे की,तारासिंग हा आपला भारतीय हल्क आणि सुपरमॅन आहे. प्रत्येकाला हल्क आणि सुपरमॅनला पाहण्याची इच्छा असते. प्रेक्षकांना माहिती असते की, त्यांचा आवडता कलाकार किंवा ती व्यक्तिरेखा जे काही करते ते बरोबरच असते. त्यामुळे त्यांच्या मनात त्या भूमिकेविषयी प्रेम होते. कलाकारांनी आपल्या भारतीय व्यक्तिरेखांवर देखील प्रेम करावे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

गदरच्या भूमिकेसाठी मी खूप तयारी केली. आपल्या प्रेक्षकांना हॉलीवूडमधील वेगवेगळ्या कलाकृती आवडतात. त्या भूमिकेत ते पूर्णपणे रंगून जातात. पण आपल्या भूमिकांवर ते प्रेम करत नाही हा प्रश्न मला नेहमीच पडत आला आहे. भारतातल्या भूमिका काय मनोरंजन करत नाहीत का, तुम्ही हल्क किंवा सुपरमॅनला आदर्श मानता पण आपला तारासिंग म्हटल्यावर तुम्हाला वाईट का वाटते असा प्रश्न सनीनं यावेळी विचारला आहे.

Gadar 2 Sunny Deol 11 August Released Hulk
Gadar 2 Sunny Deol: 'बॉलीवूड सडलेलं नाही तर सडलेली लोकं बॉलीवूडमध्ये!' सनीचा संताप

मला माहिती आहे विशिष्ट कालखंडानंतर तुमच्या आवडीनिवडीमध्ये फरक पडतो. प्रत्येक माणसाच्या भावना वेगळ्या आहेत. त्यामुळे मी किंवा माझी प्रत्येक भूमिका ही प्रत्येकाला आवडेल असेही नाही. पण किमान त्या भूमिकेमागील भावना तरी आपण समजून घेऊ शकतो की नाही हा माझा साधा प्रश्न आहे. आणि त्याचा सगळ्यांनी विचार करावा. असे आवाहनही सनीनं प्रेक्षकांना केला आहे.

मला माहिती आहे की आताच्या काळात जर तुम्हाला चांगला डान्स करता आला नाही किंवा तुमची चांगली बॉडी नसेल तर तुम्ही चांगले कलाकार नाही असे म्हटले जाते. मला वाटते सगळ्यात महत्वाचे काय असेल तर माणसाची भावना...आणि त्याद्वारे कलाकार व्यक्त होत असतो. मग ती भूमिका प्रेक्षकांना आवडते किंवा आवडत नाही. असे दिसून येते. म्हणून तर तुम्हाला सुपरमॅन, हल्क आवडतो पण आपला तारासिंग म्हटल्यावर काय होते माहिती नाही. असे सनीनं त्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.