Gadar 2 Find out how many Crores Sunny Deol and Ameesha Patel : सनी पाजीच्या गदर २ ने एव्हाना देशभरातील बहुसंख्य चाहत्यांना वेडं केलं आहे. सध्याचे वातावरण तर गदर २ ने प्रभावित झाले आहे. ज्याच्या त्याच्या तोंडी सनीच्या गदर २ चे नाव आहे. त्याचे कारण गदर २ चे झालेलं प्रमोशन आणि त्याची लोकप्रियता. तब्बल दोन दशकांनंतर सनीच्या गदर २ चा पुढील भाग प्रदर्शित झाला आहे.
अनिल शर्मा दिग्दर्शित गदरच्या पहिला भागानं प्रेक्षकांना जिंकून घेतले होते. त्यानंतर प्रेक्षक गेली २२ वर्षे गदरच्या सिक्वेलची वाट पाहत होते. आता त्याचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. पाच दिवसांत या चित्रपटानं १३० कोटींपेक्षा जास्त कमाई करुन एक वेगळाच विक्रम आपल्या नावावर केला आहे.
Also Read - दिल्लीतल्या केवळ प्रशासकीय बदल्यांपुरतंच मर्यादित नाही, दिल्ली सेवा विधेयक. काय आहेत तरतुदी जाणून घ्या
सनीनं गदर २ मधून आपल्या नावाची वेगळी ओळख प्रेक्षकांच्या मनावर उमटवली आहे. देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये या चित्रपटाचे सेलिब्रेशन जोरदारपणे सुरु आहे.त्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. कुटूंबासमवेत लोकं थिएटरमध्ये गर्दी करु लागले आहेत. मोठमोठ्या गाड्या भरून प्रेक्षक गदर २ चा आनंद घेण्यासाठी जाताना दिसत आहेत.
यासगळ्यात गदर २ च्या बजेटची चर्चा रंगताना दिसत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार शंभर कोटींपेक्षाही कमी बजेट असलेल्या गदरनं आता १३० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. निर्मात्यांना सर्वाधिक मानधन हे सनी देओलला द्यावे लागले आहे. मात्र सनीनं जेवढं मानधन घेतलं त्यापेक्षा तिप्पट-चौपट गदर २ ला मोठा फायदाही करुन दिल्याचे दिसून आले आहे. मेकर्सकडून गदर २ च्या बजेटविषयी अधिकृतपणे कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
किंग खानच्या पठाणनं पहिल्याच आठवड्यात विक्रमी कमाई केली होती. ते रेकॉर्ड ब्रेक करण्याच्या जोरदार तयारीत गदर २ असल्याचे दिसून येत आहे. आयनॉक्स, पीव्हीआर आणि सिनपोलीस मध्ये गदर २ ची पावणे दोन लाख तिकिटांची आगाऊ बुकींग झाल्याचे दिसून आले आहे. एका मुलाखतीमध्ये दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी गदरच्या सिक्वेलपेक्षा पहिल्या गदरचे बजेट जास्त होते. सिक्वेलचे बजेट १२० कोटींपर्यत असल्याचे त्यांनी म्हटले होते.
उत्तर प्रदेश राज्य, भारतीय सैन्य दल यांचे सनीच्या गदर २ साठी मोठे सहकार्य झाल्याचे सांगण्यात येत आहे. तारा सिंगची भूमिका करणाऱ्या सनी देओलला तब्बल वीस कोटींचा चेक देण्यात आल्याची चर्चा आहे. सध्या दुसरीकडे अमिषा पटेलला देखील दोन कोटी इतके मानधन देण्यात आल्याचे वृत्त डीएनएनं दिले आहे.
गदर २ मध्ये चरणजीतची भूमिका करणाऱ्या उत्कर्ष शर्माला देखील एक कोटी रुपयांचे मानधन मिळाल्याचे त्या डीएनएच्या रिपोर्टमध्ये म्हटले गेले आहे. तर मनिष वढवा आणि सोनाक्षी सिन्हाचा भाऊ लुव सिन्हा यांना प्रत्येकी ६० लाख रुपये मानधन मिळाले आहे. तर चरणजीतच्या गर्लफ्रेंडची भूमिका करणाऱ्या सिमरत कौरला ८० लाख रुपये मानधन देण्यात आले आहे.
देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांनी काही दिवसांपूर्वी गदर २ चित्रपट पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर मेकर्सनं राष्ट्रपतींसाठी खास स्क्रिनिंगचे आयोजन केल्याचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी सांगितले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.