Gadar 2: एका गैरसमजुतीमुळे थिएटरमध्ये फोडल्या होत्या काचेच्या बाटल्या..2001 साली 'गदर'नं उडवलेली खळबळ..

'गदर 2' च्या निमित्तानं दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी 2001 साली रिलीज झालेल्या 'गदर' च्या आठवणी सांगताना लंडनमधील एक धक्कादायक किस्सा शेअर केला आहे.
Gadar 2
Gadar 2Google
Updated on

Gadar 2: 2001 मध्ये रिलीज झालेल्या 'गदर एक प्रेम कथा' या सिनेमावर लोकांनी भरभरून प्रेम केलं होतं. हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला होता. सकीना आणि तारा सिंगची रोमॅंटिक केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप पसंत पडली होती.

याव्यतिरिक्त तारा सिंगचं सिनेमातील केवळ हाताच्या बळावर जमिनीतून हॅंडपंप उखडणं आणि दमदार संवाद हे सगळंच भारी होतं. त्यावेळी प्रत्येक सीनवर खूप शिट्ट्या वाजल्या होत्या. दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी यासंदर्भात एका मुलाखतीत नुकताच मनमोकळा संवाद साधला आहे.

गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडवर बॉयकॉटचं वादळ घोंघावताना दिसत आहे. ज्यामुळे सिनेमांच्या कलेक्शनवर याचा परिणाम दिसून येत आहे.

यासंदर्भात एका वृत्तवाहिनीशी बोलताना अनिल शर्मा म्हणाले की,''आता सोशल मीडियाचं राज्य आहे,जसं ट्वीटर,इन्स्टाग्राम..या प्लॅटफॉर्मवरनं गोष्टी लवकर व्हायरल होतात. आधी असं काही नसायचं. लोक एखाद्या टपरीवर उभं राहून किंवा रस्ताच्या कडेला जमून एखाद्या गोष्टीवर आपले मुद्दे मांडायचे''.

Gadar 2
Gadar 2 मध्ये 'हा' अभिनेता दिसणार सकीनाच्या वडीलांच्या भूमिकेत, अमरिश पुरी यांना करणार रीप्लेस

अनिल शर्मा यांनी गदर सिनेमाच्या रिलीज दरम्यान एक किस्सा शेअर केला आहे. ज्यात त्यांनी सांगितलं होतं की,'' जेव्हा 'गदर' रिलीज झाला होता तेव्हा खूप गोंधळ माजला होता. काही थिएटर्समध्ये आग लावण्यात आली होती.

भोपाळ,हैदराबाद मधील अनेक थिएटर्स तेव्हा आगीत होरपळली होती. लंडनच्या एका थिएटरमध्ये तर बियरच्या बाटल्या घेऊन लोक थिएटरमध्ये गेले होते आणि तिथे लोकांनी त्या बाटल्या फोडल्या होत्या.

त्यावेळी सिनेमा मुस्लिम धर्मा विरोधात भाष्य करतोय असा गैरसमज लोकांचा झाला होता. ज्यामुळे हा हंगामा झाला होता. आम्ही हा सिनेमा कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील या हेतूनं बनवला नव्हता'', असं देखील अनिल शर्मा म्हणाले.

Gadar 2
Shehzada: प्रमोशनसाठी शहजादा जीव तोडून भटकला शेवटी हॅकर्सनं घात केला! कार्तिकला मोठा झटका

गदर रिलीज दरम्यान झालेला वाद आठवून अनिल शर्मा म्हणाले, ''तेव्हा प्रत्येक थिएटर बाहेर 50 पोलिस तरी तैनात करण्यात आले होते. दर ६ तासांनी पोलिसांची ड्युटी बदलली जायची. रोज आठ-आठ शोज तेव्हा असायचे. २४ तास सिनेमा जवळपास दाखवला जायचा''.

''सिनेमा रिलीज झाला होता तेव्हा साधारण साडे पाच करोड प्रेक्षक थिएटरात पोहोचले होते. सिनेमानं इतिहास रचला होता. आजही सिनेमाप्रती लोकांमध्ये उत्सुकता पहायला मिळते. आजही लोक 'गदर 2'' येणार तर मला थांबवून प्रश्न विचारतात,'सकीना सिनेमात असणार ना..'. 'गदर' एक सिनेमा नाही तर लोकांचे याच्याशी भावनिक बंध जोडले गेले आहेत''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.