Gadar 3 part director Anil sharma reaction : गदरचा पहिला भाग हा २००१ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर तब्बल २२ वर्षांनी त्याचा दुसरा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं कमाईचे वेगवेगळे विक्रम करण्यास सुरुवात केली आहे. तारा सिंगनं तर प्रेक्षकांना वेडं केलं आहे. अशातच दिग्दर्शक अनिल शर्मा हे वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत.
गदर २ ची गोष्ट जिथे संपते तिथे पुन्हा टू बी कंटिन्युड असे म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा गदरच्या तिसऱ्या भागाची चर्चा होऊ लागली आहे. सोशल मीडियावर गेल्या तीन ते चार दिवसांपासून गदर हा प्रचंड ट्रेडिंगचा विषय आहे. त्यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. प्रेक्षकांना तारा सिंग आणि सकीनाचा गदर २ हा देखील प्रचंड आवडल्याचे दिसून आले आहे.
Also Read - दिल्लीतल्या केवळ प्रशासकीय बदल्यांपुरतंच मर्यादित नाही, दिल्ली सेवा विधेयक. काय आहेत तरतुदी जाणून घ्या
गदर २ ने आतापर्यत केवळ पाच दिवसांत १३० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. विशेष म्हणजे सनी देओलच्या या चित्रपटाबरोबर रजनीकांत यांचा जेलर नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा ओएमजी २ नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे गदर २ ला दोन्ही चित्रपटांची जोरदार टक्कर असताना सनीनं बाजी मारली आहे.
अशात आता गदर २ नंतर गदर ३ चर्चा रंगली आहे. दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी याविषयी खुलासा केला आहे. ते म्हणाले, तुम्हाला आणखी वाट पाहावी लागणार आहे. आताच सगळं सांगून कसे होईल. संयम ठेवा, वाट पाहा तुमची निराशा होणार नाही. असे शर्मा यांनी सांगितले आहे. माझ्या आणि लेखक शक्तिमान यांच्या मनातही गदर २ नंतर आता तिसऱ्या भागाचा विचार सुरु आहे. सध्या आम्ही गदर २ वर लक्ष केंद्रित केले आहे.
चाहत्यांना आणखी थोडावेळ वाट पाहावी लागेल. त्यांना गोड बातमी मिळेल. पण त्याला आणखी काही वेळ जाऊ द्यावा लागेल. गदरच्या निमित्तानं काल एका खास पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना ही गोष्ट सांगितल्याची चर्चा आहे. दुसरीकडे सनीशी देखील बातचीत करण्यात आली तेव्हा त्यानं अपने २ आणि गदर ३ विषयी प्रतिक्रिया दिली आहे.
सनीनं दिलेल्या प्रतिक्रियेत त्यानं स्पष्टपणे काहीही सांगितलेलं नाही. अजून आपल्याकडे अपने २ साठी कोणतीही स्क्रिप्ट नाही. मला माहिती आहे की, अनेकजण या चित्रपटांची खूपच आतूरतेनं वाट पाहत आहेत. मात्र सध्या अजून तरी त्यांचा विचार नसल्याचे सनीचे म्हणणे आहे. यासगळ्यात दिग्दर्शकांनी जे सांगितले त्यावरुन तिसऱ्या पार्टसाठी ग्रीन सिग्नल असल्याची चर्चा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.