Gadkari Teaser News: गेल्या अनेक दिवसांपासून नितिन गडकरींच्या आयुष्यावर आधारीत गडकरी सिनेमाची सर्वांना उत्सुकता होती. काहीच दिवसांपूर्वी सिनेमाचं पोस्टर भेटीला आलं. पोस्टर येताच सिनेमाबद्दल आणखी उत्सुकता चाळवली गेली.
आता गडकरी सिनेमाचा पहिला टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. पहिला टीझर आल्याने गडकरी सिनेमाबद्दल आणखी उत्सुकता चाळवली गेलीय.
(gadkari marathi movie teaser based on life of union minister nitin gadkari)
गडकरीच्या टीझरमध्ये काय?
नितीन गडकरी त्यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळेच एक प्रगतशील भारत नावारूपास आला. टीझरची सुरुवातच ''या देशाची ओळख जेव्हा त्याच्या रस्त्याने होईल, तेव्हा मी आनंदाने म्हणू शकेन मी नितीन जयराम गडकरी...'' या ओळीने होतेय. त्यामुळे त्यांची बांधिलकी ही केवळ राजकारणाशी नसून समाजकारणाशीही आहे, याचा प्रत्यय येतो. टिझर पाहून प्रेक्षकांची चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
नितीन गडकरींचं रंजक आयुष्य मोठ्या पडद्यावर
दिग्दर्शक अनुराग राजन भुसारी म्हणतात, '' नितीन गडकरी हे राजकारणातील एक विलक्षण व्यक्तिमत्व आहे. पोस्टर प्रदर्शनानंतर मला अनेकांचे फोन आले. अनेकांनी मला नितीन गडकरींची भूमिका कोण साकारणार असल्याचे विचारले. मात्र ही उत्सुकता लवकरच दूर होईल. एक सर्वसामान्य कार्यकर्ता, समाजसेवक ते प्रमुख कॅबिनेट मंत्री हा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. त्यांचे वैयक्तिक आयुष्यही तितकेच रंजक आहे. त्यांचे हे दुसरं जग जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता आहे. खासगी आयुष्यात नितीन गडकरी कसे होते आणि कसे आहेत, हे 'गडकरी'मधून प्रेक्षकांना जाणून घेता येईल.''
या तारखेला गडकरी सिनेमा होणार रिलीज
परंतु ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. नितीन गडकरींचा हा जीवनपट प्रेक्षकांना २७ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहात पाहाता येणार आहे.
सिनेमात नितीन गडकरींची प्रमुख भूमिका कोण साकारणार? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. परंतु आतापासूनच सिनेमाची प्रेक्षकांमध्ये चांगली हवा निर्माण करण्यात आलीय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.