Gandhi Jayanti 2023: गांधीजींना समजून घ्यायचयं मग 'हे' सर्वोत्कृष्ट चित्रपट नक्कीच पहा!

Gandhi Jayanti Special Bollywood Movies on Father of the Nation  You must Watch
Gandhi Jayanti Special Bollywood Movies on Father of the Nation You must Watch Esakal
Updated on

2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी केली जाते. दलितांच्या उत्थानासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे, जनसमुदायाला सशक्त करणारे आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे गांधीजींचे जीवन हे आजच्या पिढीसाठी खरचं प्रेरणादायी आहे.

देशाच्या स्वातंत्र्यात त्याचे महत्त्वपुर्ण योगदान होते आणि म्हणूनच आज संपूर्ण देश त्यांना स्मरण करतो. बॉलिवूडमध्येही गांधींच्या जीवनावर अनेक चित्रपट तयार करण्यात आले आहेत. आज गांधी जयंतीच्या निमित्ताने तुम्ही गांधीजींच्या आयुष्यावरील हे काही उत्कृष्ट चित्रपट नक्कीच पाहू शकतात.

'गांधी'

रिचर्ड ॲटनबरो यांचा 'गांधी' हा चित्रपट 1982 मध्ये प्रदर्शित झाला होता. आजही हा सिनेमा गांधीजींवर बनलेला सर्वोत्कृष्ट चित्रपट मानला जातो.या चित्रपटात गांधीजींचे जीवन अगदी जवळून दाखवण्यात आले होते.

इतकच नाही तर या चित्रपटाने 8 वेगवेगळ्या श्रेणींमध्ये ऑस्कर पुरस्कार आणि गोल्डन ग्लोब जिंकले आहेत. या चित्रपटाला IMDb वर 8 रेटिंग मिळाले आहे. हा चित्रपट तुम्ही Amazon Prime Video आणि Netflix वर पाहू शकता.

Gandhi Jayanti Special Bollywood Movies on Father of the Nation  You must Watch
Mahira Khan Wedding: अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्न बंधनात! नवरीला पाहताच नवरदेव भावुक, व्हिडिओ व्हायरल

द मेकिंग ऑफ द महात्मा

द मेकिंग ऑफ द महात्मा हा चित्रपट श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेला चरित्रात्मक चित्रपट आहे. जो 1996 साली रिलिज झाला होता. या चित्रपटात रजत कपूर मुख्य भूमिकेत दिसले होते.

या चित्रपटात गांधींनी दक्षिण आफ्रिकेत घालवलेल्या आयुष्यातील काही वर्षे दाखवण्यात आली होती. हा चित्रपट फातिमा मीर यांच्या 'द अप्रेंटिसशिप ऑफ अ महात्मा' या पुस्तकावर आधारित आहे. चित्रपटाला IMDb वर 6.9 रेटिंग मिळाले आहे आणि MX Player वर उपलब्ध आहे.

'हे राम'

2000 मध्ये कमल हसनचा 'हे राम' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये नसीरुद्दीन शाह गांधींच्या भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट MX Player आणि Amazon Prime Video वर पाहता येईल. याला IMDb वर 7.9 रेटिंग मिळाले आहे.

Gandhi Jayanti Special Bollywood Movies on Father of the Nation  You must Watch
Swachhata Hi Seva Abhiyan: खिलाडी कुमार, रजनीकांतसोबत देबोलिनाच्या लहान लेकीचाही स्वच्छता मोहिमेला हातभार!

'गांधी. माय फादर'

'गांधी, माय फादर' या चित्रपटाचे दिग्दर्शन फिरोज अब्बास खान यांनी केले होते. 2007 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.

या चित्रपटात दर्शन जरीवालाने गांधींची तर अक्षय खन्नाने त्यांचा मुलगा हरिलाल गांधीची भूमिका साकारली होती. IMDb वर 7.3 रेटिंग असलेला हा चित्रपट ZEE5 आणि Amazon Prime Video वर पाहता येईल.

'नाइन आवर्स टू रामा'

1963 मध्ये आलेला 'नाइन आवर्स टू रामा' हा चित्रपट गांधींच्या हत्येवर आणि नथुराम गोडसेच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात गोडसेच्या आयुष्यातील 9 तास दाखवतो. यात जर्मन अभिनेता हॉर्स्ट बुचोलच याने गोडसेची भूमिका साकारली होती. हा चित्रपट YouTube वर उपलब्ध आहे आणि त्याला IMDb वर 6.4 रेटिंग मिळाले आहे.

Gandhi Jayanti Special Bollywood Movies on Father of the Nation  You must Watch
Thalapathy Vijay Leo : शाहरुखच्या 'पठाण'चं अन् रॉकीच्या 'KGF' चं रेकॉर्ड विजयच्या 'लिओ'नं मोडलं!

गांधीगिरी

या चित्रपटात दिवंगत अभिनेता ओम पुरी यांनी महात्मा गांधींच्या तत्त्वांवर ठाम विश्वास असलेल्या एनआरआय राय साहेबांची भूमिका साकारली आहे. 2016 चा हा चित्रपट Amazon Prime Video वर आधारित आहे.

'मैंने गांधी को नही मारा'

2005 मध्ये आलेला अनुपम खेर स्टारर चित्रपट 'मैंने गांधी को नही मारा' हा सिनेमा अमेझॉन प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.