गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईनं सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमकीचं पत्र पाठवलं होतं.
मुंबई : सध्या तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईनं (Lawrence Bishnoi) सलमान खान (Salman Khan) आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमकीचं पत्र पाठवलं होतं. पत्र घराच्या जवळ टाकण्यासाठी त्याच्या टोळीतील तीन जण राजस्थानच्या जालोर येथून मुंबईत आले होते. त्यांनी आरोपी सौरभ महाकाळची (Saurabh Mahakal) भेट घेतली असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दिलीय.
थेट सलमान खानला धमकी देण्यात आल्यानं मुंबई पोलिसांना एक पद्धतीचं आवाहन होतं. परंतु, पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावलाय. सलमानचे वडिल सलीम खान नेहमीप्रमाणे 5 जून रोजी मॉर्निंग वॉकला गेले असताना त्यांना हे धमकीचं पत्र मिळालं होतं. सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईच्या खास माणसाकडून धमकीचं पत्र (Salman Khan Death Threat) पाठवण्यात आल्याची माहिती मिळालीय. गँगस्टर विक्रम बराड यानंच हे धमकीचं पत्र सलमान खान यांचे वडील सलीम खान यांच्यापर्यंत पोहोचवलं होतं, अशी माहिती समोर आलीय.
विक्रम बराड (Vikram Barad) हा राजस्थानचा कुख्यात गुंड आहे. विक्रमवर 24 पेक्षाही अधिक गुन्हे दाखल झाले असून तो राजस्थानचा रहिवासी आहे. विक्रम देशाबाहेर पळून गेल्याची पोलिसांना शंका आहे. बराडचे संबंध एनकाऊंटरमध्ये मारल्या गेलेला गँगस्टर आनंदपालचा भाऊ अनमोल याच्याशी असल्याची माहिती देखील समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानला धमकी देण्यासाठी तीन लोक मुंबईला आले होते. हे तिघेही सौरभ महाकाळला भेटले. महाकाळची मुंबई क्राईम ब्रान्च (Mumbai Crime Branch) सहा तास चौकशी केली. या चौकशीत सलमान खानला धमकी ही गँगचा पब्लिसिटी स्टंट असल्याची माहिती दिली आहे. सलमान खानला धमकी पाठवणाऱ्या पत्राचा मास्टर माईंड विक्रमजीत सिंह बराड आहे. बराड हा हनुमानगड, राजस्थानचा आहे.
एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता सलमान खान आणि त्याच्या वडिलांना धमकी देणाऱ्या पत्राचा तपास करणाऱ्या मुंबई गुन्हे शाखेच्या पथकानं गुरुवारी पुण्यात जाऊन लॉरेन्स बिश्नोई टोळीचा भाग असलेल्या सौरभ महाकाळची चौकशी केल्याचं एका पोलिस अधिकाऱ्यानं सांगितलं. सलमान खानच्या धमकी पत्र प्रकरणात महाकाळ आणि संतोष जाधव यांचा थेट संबंध नाही. ते या प्रकरणातील संशयित नाहीत, असं पोलीस सूत्रांकडून कळतं. मात्र, सलमान खानच्या धमकी पत्राबाबत महाकाळला माहिती असल्याचं प्रथमदर्शनी दिसतं. तथापि, या प्रकरणात बिश्नोई टोळीचा सहभाग असल्याचं अधोरेखित केलं जाऊ शकतं. महाकाळकडं त्याबद्दलची माहिती असून त्याची चौकशी केली जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.