Gashmeer Mahajani: मराठमोळा अभिनेता गश्मीर महाजनी हा गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहे. गश्मीरचे वडील रविंद्र महाजनी यांचं ११ जुलैला निधन झाले. त्यानंतर गश्मीर चर्चेत आला. रविंद्र महाजनींच्या अकस्मात निधनाने सर्वांना धक्का बसला.
रविंद्र महाजनींच्या निधनानंतर गश्मीरला मोठ्या टीकेला तोंड द्यावे लागले. अनेकांनी त्याला ट्रोल केलं. याचा परिणाम गश्मीरवर झाला. त्याने सोशल मीडियावरुन ब्रेक घेतला. गश्मीरने बाबा गेल्यावर त्याच्या आरोग्यावर झालेला परिणाम झाल्याचं त्याने सांगितलं.
मात्र आता बऱ्याच दिवसानंतर गश्मीर मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर करत चाहत्यांना ही माहिती दिली. आता गश्मीर पुन्हा एका ऐतिहासिक भुमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.
इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, "पुन्हा एकदा तोच प्रवास… लवकरच …" त्याने शेयर केलला व्हिडिओत वेगवेगळे फोटो दिसत आहेत. त्यात गश्मीर पुन्हा राजांच्या लूकमध्ये दिसतोय. मात्र या चित्रपटाचं नाव काय असेल आणि गश्मीर त्यात कोणती भुमिका साकारणार याबाबत त्याने काहीही माहिती दिलेली नाही.
मात्र त्याचे चाहते त्याला या लूकमध्ये पाहून खुप उत्साहीत झाले आहे. ते त्याच्या लूकचे कौतुक करत आहेत. तर नेटकऱ्यांनी कमेंटमध्ये गश्मीरला छत्रपती संभाजी महाराजांच्या भुमिकेत पाहायचे असल्याचं सांगितले आहे.
गश्मीर महाजनी सतत चाहत्यांच्या संपर्कात असतो. गश्मीरला आपण विविध सिनेमा, मालिकांमधुन अभिनय करताना पाहिलंय. टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेता याशिवाय मराठी चित्रपटांतून लक्षवेधी भूमिका करुन त्याने प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. सोशल मीडियावर आपल्या फोटो, व्हिडिओमुळे तो नेहमीच चर्चेत असतो.
त्याचा चाहतावर्गही मोठा आहे. देऊळ बंद', 'कॅरी ऑन मराठा', 'वन वे तिकिट', 'मला काही प्रॉब्लेम नाही' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये अभिनेता गश्मीर महाजनीने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या.
त्याचबरोबर गश्मीरने 'सरसेनापती हंबीरराव' या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. आता पुन्हा एकदा तो ऐतिहासिक भूमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. त्याच्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.