Gaurav More on kamgar din babasaheb ambedkar : गेल्या काही वर्षात सोनी मराठी वाहिनीवर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (maharashtrachi hasyajatra) या मालिकेने अक्षरशः महाराष्ट्राला वेड लावले आहे. एकास एक पात्र, उत्तम संहिता आणि ते सादर करणारे इरसाल नमुने म्हणजेच आपले हास्यरथी यांनी आपलयाला खळखळून हसवले.
या कार्यक्रमातील एक अविभाज्य घटक म्हणजे 'गौरव मोरे'. त्याचे काही गाजलेले स्किट आजही समाज माध्यमांवर धुमाकूळ घालत आहेत. गौरव सोशल मिडियावरही प्रचंड सक्रिय असतो. आजवर तो बाबासाहेब आंबेकर यांच्याविषयी कायमच कृतज्ञता व्यक्त करत आला आहे. आज त्याने कामगार दिनी पुन्हा एकदा बाबासाहेब आंबडेकर यांचे स्मरण करून दिले आहे.. त्याच संदर्भात त्याने एक पोस्ट शेयर केली असून सर्वांचे लक्ष वेधले आहे.
(Gaurav More shared post about kamgar din dr babasaheb ambedkar maharashtra din)
आज 1 मे.. आजचा दिवस महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. 106 हुतात्म्यांचे आणि अनेकांचे रक्त सांडून हा महाराष्ट्र स्वतंत्र झाला आहे. ही मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ नये म्हणजे मोठाव झाला. अखेर 1 मे 1960 महाराष्ट्र मुंबईसह 'संयुक्त महाराष्ट्र' झाला.
याच सोबत आजचा दिवस कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो. अनेकजन आज या निमित्ताने व्यक्त होत आहेत. अशातच अभिनेता गौरव मोरेने देखील महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी एक खास फोटो शेयर करत त्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समारण करून दिले आहे.
गौरव ने एक पोस्टर शेयर केले आहे. ज्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांचा फोटो आहे. यामध्ये ''कामगारांचे खरे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर.. कामगार दिनाच्या मंगलकामना'' असे लिहिले आहे तर दुसऱ्या फोटोत 'मंगल देशा.. पवित्र देशा.. महाराष्ट्र देशा.. ' असं म्हणत महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा त्याने दिल्या आहेत.
गौरवने ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेतून पदार्पण केलं. यामध्येही त्याने विनोदी भूमिका साकारली होती. पण महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून तो प्रकाशझोतात आला. ‘फिल्टर पाड्याचा बच्चन’ म्हणून त्याचिं ख्याती रसिकांमध्ये पसरली आहे. मराठी मालिका आणि चित्रपटांसोबतच त्याने हिंदीतही काम केलंय. संजू, झोया फॅक्टर यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये त्याने भूमिका साकारल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.