Gauri Khan Birthday Special : किंग खान शाहरुखचा केवळ भारतातच नाहीतर साऱ्या जगभर डंका आहे. या वर्षी त्याचे आतापर्यत दोन चित्रपट प्रदर्शित झाले. त्यात पठाणनं एक हजार कोटींची कमाई केली तर जवानला सातशे कोटींच्या कमाईवर समाधान मानावे लागले आहे. डिसेंबरमध्ये त्याचा डंकी चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. Happy birthday gauri khan Property Income And net worth
यासगळयात शाहरुखला सगळ्यात मोठा सपोर्ट त्याची पत्नी गौरीचा आहे. शाहरुखची रेड चिलीच नावाची जी निर्मिती कंपनी आहे त्याचे व्यवस्थापन गौरी पाहते. तिची केवळ भारतातच नाही तर जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये प्रॉपटी असल्याचे बोलले जाते. आज गौरीचा जन्मदिवस असून त्यानिमित्तानं तिच्या चाहत्यांनी तिचे अभिष्टचिंतन केल्याचे दिसून आले आहे. खरं तर गौरीचा आणि बॉलीवूडचा प्रत्यक्षपणे काही संबंध नसला तरी तिनं स्वताची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
काही चित्रपटांमध्ये गौरीनं भूमिका देखील केल्या आहेत. यापूर्वी तिनं बॉलीवूड वाईव्हजमधून प्रेक्षकांची मनं जिंकून घेतले होते. शाहरुखला सारं जग बॉलीवूडचा बादशाह म्हणून ओळखते. दुसरीकडे गौरी ही बिझनेस वुमन आहे. तिनंही उद्योगविश्वात स्वताच्या नावाची वेगळी छाप उमटवली आहे. गौरीनं आता ५३ व्या वर्षात पाऊल टाकले असून सोशल मीडियावर गौरीला फॉलो करणाऱ्या चाहत्यांची काही कमी नाही.
दिल्लामध्ये ८ ऑक्टोबर १९७० रोजी गौरीचा जन्म झाला. एका पंजाबी परिवारातून आलेल्या गौरीनं दिल्ली विश्वविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. तिनं इतिहास विषयात पदवी घेतली आहे. त्यानंतर एनआयएफटी मधून सहा महिन्याचे फॅशन डिझायनिंग प्रशिक्षणही पूर्ण केले आहे. यानंतर तिनं इंटेरिअर डिझायनिंगमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. आज ती त्या क्षेत्रात टॉपवर असल्याचे दिसून आले आहे.
गौरी आणि शाहरुखनं १९९१ मध्ये लग्न केलं. त्यानंतर ती त्याच्यासोबत मुंबईमध्ये आली. तिनं २००२ मध्ये रेड चिलीज नावाची प्रॉडक्शन कंपनी सुरु केली. या कंपनीनं मैं हू ना, रईस, जवान सारखे चित्रपट प्रदर्शित केले आहेत. त्यानंतर आगामी डंकीची निर्मीतीही रेड चिलीजनं केली आहे. गौरीनं पहिल्यांदा मन्नतचे इंटेरिअर तयार केले होते. बॉलीवूडमधील कित्येक सेलिब्रेटींच्या घरांचे इंटेरिअर गौरीनं केले आहेत. एवढेच नाहीतर मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या अँटेलियाचे इंटेरिअर गौरीनं केले असल्याचे सांगितले जाते.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरी ही दुबईत देखील तिचा बिझनेस सांभाळते. काही रिपोर्टस नुसार तिचा त्या देशामध्ये १८ हजार कोटींचा बिझनेस आहे. २००८ मध्ये किंग खाननं सांगितले होते की, त्यानं दुबईमध्ये रियल इस्टेटमध्ये एका कंपनीसोबत भागीदारी केली आहे. त्याचे नाव SRK Boulevard असे आहे. लाईफस्टाईल एशियाच्या एका रिपोर्टनुसार, गौरी ही १६०० कोटींची मालकीण असल्याचे बोलले जाते. तिचा केवळ मुंबईच नाहीतर दिल्ली, अलिबाग, लंडन, दुबई आणि लॉस एंजेलिसमध्ये बिझनेस आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.