Gauri Pagare : कौतुक म्हणायचं की मनाचा कोतेपणा? जिंकल्यानंतरही गौरीला...! काय आहे कारण

गौरी पगारे हे नाव आता महाराष्ट्रातल्या घराघरात माहिती झालं. त्याचं कारण सारेगमपचा लिटिल चॅम्पसचा शो.
Gauri Pagare Sa Re Ga Ma Pa 2023 Winner
Gauri Pagare Sa Re Ga Ma Pa 2023 Winner esakal
Updated on

Gauri Pagare Sa Re Ga Ma Pa 2023 Winner : गौरी पगारे हे नाव आता महाराष्ट्रातल्या घराघरात माहिती झालं. त्याचं कारण सारेगमपचा लिटिल चॅम्पसचा शो. त्यामधून गौरी, गौरीची परिस्थिती, तिचा संघर्ष हे सारं प्रेक्षकांपर्यत जाऊन पोहचलं, बाकीच्या स्पर्धकांसारखं तिच्या प्रोफाईलविषयी सांगण्यात आलं. संगीत, गायन याविषयी कोणतीही पार्श्वभूमी नसताना सर्वोत्तम गायिका होण्यापर्यत गौरीनं मजल मारली.

गौरीचं सध्या सोशल मीडियावर जेवढं कौतुक होतंय त्यापेक्षा जास्त तिच्यावर वेगवेगळ्या स्वरुपाच्या प्रतिक्रिया व्हायरल झाल्या आहेत. नेमक्या कोणत्या कारणामुळे गौरी ट्रोल होतेय, नेटकऱ्यांना कुठल्या गोष्टीचा जास्त राग आहे, गौरीपेक्षा जास्त प्रभाव टाकणारे स्पर्धक होते का, त्यांना विजेता म्हणून घोषित का केले गेले नाही, मेकर्सचं काही खास धोरण आहे का, नेहमीप्रमाणे याही वेळेस मेकर्सनं प्रेक्षकांना नाराज केले का, या प्रश्नांची उत्तर नेटकऱ्यांनी दिली आहे.

Life Balance जाणून घ्या हा 'वेक अप काॅल' आणि बना सर्वार्थाने समृद्ध

कित्येक नेटकऱ्यांना गौरीची विजेतापदी झालेली निवड चुकीची वाटत आहे त्याचे मुख्य कारण तिच्या परिस्थितीचा केला गेलेले उदात्तीकरण, स्पर्धा गायनाशी संबंधित आहे तर त्याच्या निकषावर विजेतपद दिले जावे असे नेटकऱ्यांचे, प्रेक्षकांचे म्हणणे आहे, अशावेळी संबंधित स्पर्धक काय करतो, तो कुठून आला आहे, हे सांगण्यात किंवा दाखवण्यात मेकर्सचा नेमका कोणता हेतू असतो, असे प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केले आहे.

कित्येक नेटकऱ्यांनी दरवर्षी प्रमाणे मेकर्सकडून अनपेक्षित निकाल पाहायला मिळाला असे म्हणत, गौरी ऐवजी श्रावणी हीच विजेतापदाची खरे दावेदार असल्याचे म्हटले आहे. ही स्पर्धा पार पडल्यानंतर आता तीन दिवस उलटून गेले तरी त्यावरुन सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रियांना उधाण आले आहे. यात गौरीचं कौतुक कमी पण ती विजेती म्हणून कशी योग्य नाही याचे विश्लेषण करणाऱ्या पोस्ट आणि कमेंट व्हायरल होत आहे.

Gauri Pagare Sa Re Ga Ma Pa 2023 Winner
Gauri Pagare : कोपरगावच्या गौरीने सा रे ग म प लिटिल चॅम्पस् च्या विजेतेपदावर कोरलं नाव

यापूर्वी देखील झी च्या या शो मधून अशा प्रकारचे निकाल समोर आले आहेत. त्यावेळी देखील ज्या स्पर्धकांना विजेता म्हणून घोषित केलं जाईल असे वाटत होते त्याऐवजी दुसऱ्या स्पर्धकांना विजेतेपद दिलं गेलं. त्यामुळे हा शो पाहत नाही. असेही काही नेटकऱ्यांनी म्हटले आहे.यंदाच्या सारेगपमच्या फायनल मध्ये मुंबईची श्रावणी वागळे, गोव्याचा ऋषीकेश ढवळीकर, जयेश खरे, देवांश भाटे, गीत बागडे आणि कोपरगावची गौरी पगारे स्पर्धक सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.