Gautami Patil: गौतमी आली, पण कार्यक्रम झालाच नाही; ती म्हणाली मी पुन्हा...शिरूरमध्ये असं काय घडलं?

गौतमी पाटील कार्यक्रमाला आली, पण कार्यक्रम झाला नाही
gautami patil
gautami patil SAKAL
Updated on

प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना नेहमीच अलोट गर्दी दिसून येते. तिच्या कार्यक्रमाला तरुणांसह वृद्ध महिला यांची झुंबड उडत असते. तिचे राज्यभरात कार्यक्रम हिट होतात. सार्वजनिक मंडळांकडून तिच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर मागणी दिसून येते. हल्ली तर वाढदिवसाच्या निमित्तानेही लोक गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवतात. त्यामुळे गौतमीची क्रेझ किती प्रचंड आहे हे दिसून येतं.

गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात तरुणांची प्रचंड गर्दी होते. अनेकांची हुल्लडबाजी दिसून येते. पोलिसांनी तरुणांवर लाठीमार केल्याच्या बातम्या अलीकडे मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. पण तरीही तिच्या कार्यक्रमांना मोठी मागणी आहे. अशातच शिरूरमध्ये मात्र पहिल्यांदाच गौतमीचा होणारा कार्यक्रम रद्द करावा लागला आहे. कार्यक्रमाची तयारी होऊनही कार्यक्रम रद्द करावा लागल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

gautami patil
Ajit Pawar Not Reachable: अजित पवार नॉट रिचेबल? पक्षातील 7 आमदारही संपर्काबाहेर; चर्चा-अफवांना उधाण

पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील अन्नापूर येथे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला शिरूर पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यामुळे गौतमीचा कार्यक्रम ऐनवेळी रद्द करण्याची वेळ आयोजकांवर आली आहे. विशेष म्हणजे गौतमी स्वत: कार्यक्रमाला हजर झाली होती. त्यावेळी तिला कार्यक्रम रद्द झाल्याचं सांगण्यात आलं आहे.

गौतमीच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होते. लाठीमार होतो. त्यामुळे पोलिसांनी ही परवानगी नाकारल्याचं बोललं जातं आहे. मात्र गौतमीच्या ऐवजी तिची सहकारी हिंदवी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन आयोजकांनी केलं होतं. पोलिसांनी हिंदवी पाटीलच्या कार्यक्रमाला परवानगी दिली होती. त्यामुळे गौतमीचा कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्यांच्या पदरी निराशा आली.

gautami patil
Indigo Flight: धक्कादायक! मद्यधुंद प्रवाशाचा पुन्हा विमानात धिंगाणा, आपत्कालीन दरवाजा...

अण्णापूर हे शिरूर तालुक्यातील गाव आहे. या गावात यात्रेनिमित्त मनोरंजन म्हणून तमाशा ठेवण्याची आधीपासूनची परंपरा आहे. मात्र गेली कित्येक वर्ष या गावात तमाशाच्या कार्यक्रमात अनेकदा भांडण होत असतात. त्यामुळे शिरूर पोलिसांनी कायदा सुव्यवस्था नीट राखण्यासाठी गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमास ऐनवेळी परवानगी नाकारली आहे.

gautami patil
Delhi Fire: दिल्लीतील टिकरी पीव्हीसी मार्केटमध्ये भीषण आग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.