Gautami Patil: धन्य ती माऊली! गौतमी पाटीलच्या आईचा पहिला Video व्हायरल..

गौतमीने आईला घट्ट मिठी मारली आणि.. व्हिडिओ व्हायरल..
gautami patil mother video viral she hugs her emotionally
gautami patil mother video viral she hugs her emotionally sakal
Updated on

Gautami Patil : Gautami Patil: महाराष्ट्रातील चर्चेत असलेलं नाव म्हणजे गौतमी पाटील. गल्ली गौतमीची कोणतीही गोष्ट हा कौतुकाचा, टीकेचा किंवा चर्चेचा विषय असतो. सर्वांचे लक्ष तिच्यावर लागलेले असते.

या आधी तिच्या नाचावर, तिच्या हावभावावर बरीच चर्चा झाली, वाद झाले आता मात्र गौतमी हा अनेकांच्या कौतुकाचा विषय ठरत आहे. अनेकजण तिच्या विषययी खूप चांगल्या प्रतिक्रिया देत आहेत.

गौतमी आजपर्यंत तिच्या आईविषयी बऱ्याचदा बोलली आहे. आईला नाही सांभाळलं तर मी नवऱ्यालाही सोडून देईल, अशी प्रतिक्रिया तिनं दिली होती. तेव्हापासून तिच्या आईला पाहण्यासाठी सारेच उत्सुक होते.

काही दिवसांपूर्वीच तिनं आपल्या आई सोबतचा एक फोटों शेयर केला होता. गौतमी अगदीच लहान असतानाचा हा फोटो तिने आपल्या सोशल मीडियावर शेयर केला होता. आता मात्र तिच्या आईचा सध्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो तूफान व्हायरल होत आहे.

(gautami patil mother video viral she hugs her emotionally)

gautami patil mother video viral she hugs her emotionally
Kirron Kher HBD: नव्या प्रेमाची जाणीव झाली, आणि किरण खेर यांनी पहिल्या नवऱ्याला दिला घटस्फोट.. खास किस्सा!

 गौतमीची आईच नाही तर काही दिवसांपूर्वी गौतमीचे वडील रवींद्र पाटील हे देखील माध्यमासमोर आले. तेव्हा देखील बरीच चर्चा झाली. त्यावेळी रवींद्र पाटील यांनी गौतमीने परत यावं, मला आपलं म्हणावं अशी इच्छा व्यक्त केली होती.

त्याला काही दिवस उलटले असतानाच गौतमीने तिच्या आईचा एक तरुणपणीचा फोटो शेअर केला, ज्यामध्ये गौतमी अगदी लहान दिसत होती. या फोटोला चाहत्यांची बरीच पसंती मिळाली. सर्वांनी तिच्या आईचे कौतुक केले. पण आता तिची आई कशी दिसते हे जाणून घेण्यासाठी सर्वच उत्सुक होते. आणि अखेर तो दिवस आलाच..

gautami patil mother video viral she hugs her emotionally
Digpal Lanjekar: अमेरिकेत छत्रपती शिवाजी महाराजांना दिली अशी मानवंदना की पाहून अंगावर काटा येईल.. Viral Video

आता गौतमीच्या आईचा सध्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. गौतमीची आई पहिल्यांदाच कॅमेऱ्या समोर आली आहे. एका सोशल मीडिया चॅनेलने तिच्या आईचा व्हिडिओ शेयर केला आहे.

यामध्ये गौतमीचा एक चाहता ही आहे. तो म्हणतो, ''उंबराच्या झाडाला दत्तगुरूंची सावली.. गौतमीला जन्म देणारी धन्य ती माउली''. तो असे म्हणताच गौतमीची आई समोर येते आणि गौतमी आपल्या आईला घट्ट मिठी मारते.

या निमित्ताने पहिल्यांदाच सर्वांना गौतमीची आई पाहायला मिळाली. त्यामुळे हा व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.