Swasthyam 2022: '...हाच तर अस्सल डाएट!' जेनिलियानं सांगून टाकलं तिचं डाएट सीक्रेट; म्हणाली...

जेनेलिया स्वता: विगन डाएट फॉलो करत असली तरी महाराष्ट्रीयन जेवण म्हणजे किती जबरदस्त डाएट आहे हे समजवून सांगितले आहे.
Swasthyam 2022
Swasthyam 2022esakal
Updated on

Genelia & Riteish Diet Secret: जेनेलिया आणि रितेश देशमुख यांचे सोशल मीडियावरील कॉमेडी व्हिडीओज आपण सगळेच बघत असाल. कोणताही कार्यक्रम असो किंवा मग सोशल मीडिया हे जोडपं तुम्हाला सतत आनंदीच दिसेल. तेव्हा यांच्या आनंदी आणि हेल्दी लाईफचं सीक्रेट काय असेल असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. सकाळ समुहाने जेनिलिया आणि रितेशसोबत केलेल्या बातचीतमधून तुम्हाला नक्कीच याचे उत्तर मिळेल. चला तर काय आहे या जोडप्याचं हॅप्पी आणि हेल्दी लाईफ सीक्रेट ते जाणून घेऊया.

मागल्या तीन दिवसांपासून आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी आणि आरोग्याशी निगडीत वाचकांच्या विविध समस्या लक्षात घेऊन त्यावर उपाय सुचवणारा एक उत्तम असा उपक्रम सकाळ समुहाने राबवला होता. 'सकाळ स्वास्थ्यम 2022' च्या माध्यमातून रितेश आणि जेनिलियाने त्यांचे फिटनेस सीक्रेट आणि आनंदी जीवनाचा मंत्र वाचकांना शेअर केला. हा मंत्र नेमका काय आहे ते जाणून घेऊया.

जेनिलिया आणि रितेश हे जोडपे मागल्या चार वर्षापासून वीगन डाएट फॉलो करत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र महाराष्ट्रीयन जेवण म्हणजे संपूर्ण तत्वांनी युक्त असं जेवण असल्याचेही ते म्हणाले. लातूर हे जेनिलियाच्या हृदयाच्या फार जवळचे स्थान असून गावातली चटनी भाकरी तिची फार आवडती असल्याचे ती म्हणाली.

'वीगन डाएट म्हणजे नुसत्या कच्च्या भाज्या खाणे असा अर्थ होत नाही. मी तर पावभाजीही खातो. असे सांगत पावभाजीमध्ये भाज्याच असतात,' असे रितेश म्हणाला. वीगन डाएट हे सरळ साधंच जेवण असून त्याला बनवण्यासाठी फक्त तुम्हाला थोडी मेहनत घ्यावी लागते असे तो म्हणाला.

Swasthyam 2022
Riteish-Genelia: ती 17 अन् मी 23 चा असताना एकमेकांच्या प्रेमात पडलो

महाराष्ट्रीय थाळी एकदम भारी

जेनेलियाने तर महाराष्ट्राच्या संपूर्ण थाळीचा संदर्भ देत डाएट प्लान सांगून टाकला. आपल्या महाराष्ट्रीयन जेवणात सगळे पदार्थ एवढे प्रोटीन, कार्ब्स आणि विटॅमिन्सयुक्त असतात की तुम्हाला दुसरं कुठलं डाएट प्लॅन फॉलो करायची गरजच नाही. तेव्हा घरचे पदार्थ खा, स्वत:ला सशक्त ठेवा आणि निरोगी राहा असा डाएट मंत्र तिने वाचकांना दिला. तुमचं आरोग्य चांगलं असलं की तुम्ही आपोआप आनंदी असता. तुमच्या चेहऱ्यावर तेज असतं असं सुद्धा तिने वाचकांना सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.