Genelia Deshmukh Birthday: मुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणुन माज.. रितेशला पहिल्यांदा पाहिल्यावर जिनिलीया काय म्हणाली बघा

आज जिनीलिया देशमुखचा वाढदिवस. त्यानिमित्ताने पाहूया रितेश - जिनिलीयाची लव्हस्टोरी
genelia deshmukh and riteish deshmukh love story genelia birthday special friendship day 2023
genelia deshmukh and riteish deshmukh love story genelia birthday special friendship day 2023 SAKAL
Updated on

आज जिनीलिया देशमुखचा वाढदिवस. जिनीलियाने तिच्या अभिनयाने हिंदी नव्हे तर मराठी मनोरंजन विश्वाला सुद्धा वेड लावलं. जिनिलियाच्या वाढदिवसानिमित्ताने आज आपण तिची लव्हस्टोरी पाहूया.

वर्ष होते 2002 होते. तेव्हा फक्त जिनीलिया फक्त 16 वर्षांची होती आणि रितेश 25 वर्षांचा होता. हे दोघे सिनेमाच्या ऑडीशनला हैद्राबादला येणार होते.

(genelia deshmukh and riteish deshmukh love story)

genelia deshmukh and riteish deshmukh love story genelia birthday special friendship day 2023
वाढदिवशीच रसिका सुनीलने सर्वांना दिली आनंदाची बातमी

रितेशला माज असेल असं जिनीलियाला का वाटलं?

रितेश हा तेव्हा महाराष्ट्राचा तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचा मुलगा आहे हे आपणा सर्वांना माहीत आहे. जिनीलियाने असे गृहीत धरले की तो एक बिघडलेला मुलगा असेल आणि त्याच्यात माज असेल. जिनीलिया रितेशला गृहीत धरलं होतं.

पण जेव्हा त्यांनी एकमेकांशी संवाद साधला त्यानंतर तिला कळले की, रितेश अत्यंत नम्र व्यक्ती आहे. तिने एका मुलाखतीत सांगितले की, मुख्यमंत्र्यांचा मुलगा असूनही रितेशने जिनीलियाच्या आई-वडिलांचा आदर करणारा केला. जिनीलियाला हे पाहून फार आनंद झाला.

प्रेमाला नसतं वयाचं बंधन

पण जेव्हा तुझे मेरी कसम चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली तेव्हा लवकरच ते खूप जवळचे मित्र बनले. अगदी आर्किटेक्चरची चर्चा करण्यापासून ते जिनीलियाची परीक्षा आणि कॉलेजपर्यंत रितेशने अनेक गोष्टींची चर्चा केली. हैदराबादमध्ये शूटिंग केल्यानंतर रितेश मुंबईतील त्याच्या घरी परतला. पण तो जिनीलियाला मिस करत होता. जिनीलियाला सुद्धा रितेशची आठवण येत होती. त्यांच्या वयात 9 वर्षांचा फरक होता, परंतु प्रेमाला वयाचं अंतर नसतं म्हणतात तसंच काहीसं झालं. दोघांना एकमेकांबद्दल प्रेम वाटू लागलं

हे वर्ष 2002 होते जेव्हा फक्त 16 वर्षांची मुलगी जेनेलिया डिसूझा एक 25 वर्षांचा तरुण मुलगा रितेश देशमुखला भेटली, त्यांच्या चित्रपटाच्या चाचणीसाठी हैदराबादमध्ये.

genelia deshmukh and riteish deshmukh love story genelia birthday special friendship day 2023
Prasad - Amruta: प्रसाद - अमृताच्या कांदेपोह्यांचा कार्यक्रम, पण किचनमध्ये घडलं भलतंच, व्हिडीओ व्हायरल

९ वर्ष केलं एकमेकांना डेट

पुढे सुद्धा दोघे एकमेकांना भेटू लागले. जवळपास ९ वर्षे त्यांनी गुपचुप एकमेकांना डेट केलं. परंतु कधीही प्रपोज केलं नव्हतं. एका मुलाखतीत दोघांनी खुलासा केला की, रितेशने लग्नाच्या काही दिवस आधी जिनिलीयाला प्रपोज केले होते. आणि ते सुद्धा एकदम रोमॅंटीक.

रितेशने खुलासा केला की तो जिनिलीयाला एका स्पीड बोटीवर घेऊन गेला आणि नंतर एका यॉटवर गेला. पुढे मग दोघे मरीन ड्राइव्हला गेले. हळूहळू अंधार पडू लागला. रितेशने आवडता पिझ्झा ऑर्डर केला होता. दोघेही यॉटच्या समोर बसले. रितेशने मनात असल्याप्रमाणे जिनिलीयाला एका विशिष्ट ठिकाणी आणले. रितेशच्या एका मित्राची मरीन ड्राईव्हच्या अगदी समोर एक इमारत होती.

रितेशचं जिनिलियासाठी खास सरप्राईज

मग रितेशने जिनिलीयाला त्या इमारतीकडे बघायला सांगितले. त्यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्याचे नियोजन आधीच करण्यात आले होते. आकाशात फटाक्यांची रोषणाई झाली. आणि याच क्षणी रितेशने त्याला प्रपोज केलं. जिनिलियाला हे सर्व सरप्राईज नक्कीच आवडले.

अशाप्रकारे सुरुवातीला जिनिलीयाला रितेश आवडला नव्हता. परंतु हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली. आणि त्यांच्यात प्रेम फुलले. प्रेमाचं रुपांतर लग्नात झालं. आज हे दोघं सुखी संसार जगत आहेत. रिआन आणि रिदान ही दोन गोंडस मुलं या दोघांना आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.