Tyler Christopher Death: आणखी एका अभिनेत्याच्या मृत्यूनं हादरलं हॉलिवूड विश्व!

Tyler Christopher Death
Tyler Christopher DeathEsakal
Updated on

Tyler Christopher Death: मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. जनरल हॉस्पिटल आणि डेज ऑफ अवर लाइव्ह या फेमस शोसाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता टायलर ख्रिस्तोफर याचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने टायलरचा मृत्यू झाला आहे. जनरल हॉस्पिटलचे सह-स्टार मॉरिस बेनार्ड यांनी टायलरच्या मृत्यूची पुष्टी केली.

इन्स्टाग्रामवर पोस्ट शेयर करत त्याने ही बातमी दिली. वयाच्या अवघ्या 50 व्या वर्षी टायलरने अखेरचा श्वास घेतला. यापुर्वी अमेरिकन-कॅनडियन अभिनेता मॅथ्यू पेरीच्या निधनाच्या धक्यातून सावरलेले नसताना आता टायलरच्या मृत्यूनंतर पुन्हा हॉलिवूड विश्वाला धक्का बसला आहे.

टायलर ख्रिस्तोफरच्या निधनाच्या बातमीनंतर संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मॉरिस बेनार्डने टायलरच्या निधनाची बातमी शेयर करत इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकली. यापोस्टमध्ये त्याने लिहिले की, 'आम्ही टायलर क्रिस्टोफर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खाने शेअर करत आहोत. ह्रदयविकाराच्या झटक्याने आज सकाळी त्याचे सॅन दिएगो अपार्टमेंटमध्ये निधन झाले.'

आपल्या मित्राच्या निधनाच्या बातमीने बेनार्ड खुप दु:खी आहे तो लिहितो, 'टायलर हा खऱ्या अर्थाने एक प्रतिभावान व्यक्ती होता ज्याने प्रत्येक सीनमध्ये प्रकाश टाकला आणि आपल्या अभिनयाने लाखो लोकांची मने जिंकली. टायलर एक चांगला माणुस होता, त्याला ओळखणाऱ्या प्रत्येकासाठी तो एक चांगला मित्र होता.'

ख्रिस्तोफरने च्या कामाबद्दल बोलायचं झालं तर 1996 ते 2016 या काळात 'जनरल हॉस्पिटल'मधुन तो लोकप्रिय झाला. यात त्याने निकोलस कॅसाडिनच्या भुमिका साकारली होती. त्यानंतर 'डेज ऑफ अवर लाइव्हज फ्रॉम 2018 ते 2019' या शोमध्ये स्टीफन डिमेराच्या भूमिकेने तो जगभर प्रसिद्ध झाला. स्टीफनच्या भूमिकेत त्याने सर्वांची मने जिंकली आणि आपल्या दमदार अभिनयासाठी त्याला डेटाईम एम्मी देखील मिळाली.

ख्रिस्तोफरने त्याच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी चर्चेत होता. ख्रिस्तोफरने 2002 मध्ये डेस्परेट हाउसवाइव्ह अॅलम इवा लॉन्गोरियाशी लग्न केलं मात्र दोन वर्षांतच 2004 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

यानंतर तिने 2008 मध्ये ब्रायन पेडिगोशी लग्न केले पण हे नातेही फार काळ टिकले नाही आणि 2021 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. क्रिस्टोफर आणि पेडिगो यांना दोन मुले आहेत, ग्रेसन जेम्स क्रिस्टोफर आणि बोहम क्रिस्टोफर. टायलरच्या निधनानंतर संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.