Pankaj Udhas : 'आज की रात, बडी मुद्दतोंके बाद आयी है..'; रंकाळा महोत्सवात रंगली होती पंकज उधास यांची मैफल

‘ठंडी हवा के झोंके। चलते हैं हलके हलके...’ या गझलेने पंकजजींनी (Pankaj Udhas) मैफलीला प्रारंभ केला होता.
Ghazal Singer Pankaj Udhas
Ghazal Singer Pankaj Udhasesakal
Updated on
Summary

याच मैफलीत त्यांनी कैसर-उल-जाफरी यांची ‘दिवारोंसे मिलकर रोना अच्छ लगता है, हम भी पागल हो जायेंगे ऐसा लगता है...’ ही दर्दभरी गझल वडिलांना अर्पण केली होती.

कोल्हापूर : बरोबर सतरा वर्षांपूर्वी फेब्रुवारीच्या सोळा तारखेला रंकाळ्याच्या काठावर प्रसिद्ध गझलगायक पंकज उधास यांची मैफल रंगली होती. रंकाळ्याच्या काठावरचा (Rankala Festival Kolhapur) हा सारा माहोल पाहून या रात्रीचे ‘आज की रात नही, शिकवे और शिकायत के लिये.... आज की रात, बडी मुद्दतोंके बाद आयी है...’ असे वर्णन केले होते. त्यांनी आज आयुष्याच्या रंगमंचावरून कायमची एक्झिट घेतली आणि या साऱ्या स्मृतींना उजाळा मिळाला. १६ फेब्रुवारी २००७ रोजी रंकाळा महोत्सवात त्यांनी एकाहून एक अवीट गझला सादर केल्या होत्या.

Ghazal Singer Pankaj Udhas
Pankaj Udhas Inspirational Story : शाहरुखला पहिला पगारसुद्धा पंकज उधास यांनीच दिला होता! गुजरातमधला जमीनदार असा बनला गझलसम्राट!

‘ठंडी हवा के झोंके। चलते हैं हलके हलके...’ या गझलेने पंकजजींनी (Pankaj Udhas) मैफलीला प्रारंभ केला होता. गझल गायनाची वाटचाल, विविध शहरांत कार्यक्रम करताना आलेले अनुभव सांगत, नजाकतभऱ्या उर्दू भाषेतील एक से एक शायरी सादर करत ही मैफल सजवली होती. याच मैफलीत त्यांनी कैसर-उल-जाफरी यांची ‘दिवारोंसे मिलकर रोना अच्छ लगता है, हम भी पागल हो जायेंगे ऐसा लगता है...’ ही दर्दभरी गझल वडिलांना अर्पण केली होती.

Ghazal Singer Pankaj Udhas
Pankaj Udhas death: आपल्या मागे किती संपत्ती ठेवून गेलेत पंकज उधास, कधी मिळाले होते 51 रुपये

‘बडी मेहंगी हुयी हैं शराब के थोडी थोडी पिया करो...’, ‘चांदी जैसा रंग है तेरा...’, ‘ए-गम-ए जिंदगी मुझको दे मश्‍वरा...’ या गझलांसह ‘जिये तो जिये कैसे...’ ‘ना कजरे की धार...’ आदी गीतांनी ही मैफल अविस्मरणीय ठरली होती. ‘और आहिस्तॉं...’ ‘चिठ्ठी आयी है आयी है चिठ्ठी आयी है...’ या गीतांनीही साऱ्यांनाच मोहिनी घातली होती. दरम्यान, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे तत्कालीन संचालक भूषण गगराणी, तत्कालीन आयुक्त कुणालकुमार व तत्कालीन महापौर सई खराडे यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()