Pankaj Udhas Death : आपल्या आगळ्या वेगळ्या गायकीसाठी केवळ भारतच नाही तर जगभरामध्ये ज्यांची ख्याती होती अशा पंकज उधास यांच्या निधनाच्या बातमीनं चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या जाण्यानं भारतीय संगीतविश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. आज सकाळी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
बॉलीवूडमध्ये गेल्या चार दशकांहून अधिक काळ पंकजींनी आपल्या गायकीनं वेगळी ओळख तयार केली होती. दीर्घ आजारानं त्यांची प्राणज्योत मालवली असून त्यांच्या निधनानंतर बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी पोस्ट करत त्यांना आदरांजली वाहिली आहे. ८० च्या दशकांत पंकजींनी त्यांच्या संगीत प्रवासाला सुरुवात केली होती. त्यानंतर तब्बल चार दशकांहून अधिक काळ ते संगीत विश्वात सक्रिय होते.
पंकज उधास यांच्या कुटूंबियांकडून त्यांच्या निधनाची बातमी (pankaj Udhas death news) देण्यात आली असून त्यांनी त्याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेयर केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले (pankaj udhas song) आहे की, ते बऱ्याच दिवसांपासून एका दुर्धर आजाराचा सामना करत होते. आता पद्मश्री पुरस्कार प्राप्त पंकज उधास यांचे निधन झाल्याचे सांगताना आम्हाला कमालीचे दु:ख होत आहे.
या सगळ्यात पंकजची हे नेमक्या कोणत्या आजारानं त्रस्त होते या (bollywood singer pankaj udhas song) विषयीची बातमी समोर आलेली नाही. गझल गायिकीच्या दुनियेतील बेताज बादशहा म्हणून त्यांचे नाव घेतले जायचे. त्यांच्या निधनानंतर भारताच्या गझल गायकी विश्वात मोठी शोककळा पसरल्याचे सांगण्यात येत आहे. केवळ भारतच नाही तर जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये पंकजींचे चाहते होते. त्यांना जगभरातील विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.
पंकजींना त्यांच्या चिठ्ठी आयी है नावाच्या गझल पासून मोठी (padmashri pankaj udhas) लोकप्रियता मिळाली होती. १९८६ मध्ये प्रदर्शित झालेल्या नाम मधील त्या गझलनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. इतक्या वर्षांनी देखील ती गझल कमालीची लोकप्रिय असल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर दिल्लगी, फिर तेरी कहानी याद आई, चले तो कट ही जाएगहा आणि तेरे बिन नावाच्या गझलला प्रेक्षकांची लोकप्रियता मिळाली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.