Ghoomer Review: एक हात नसला म्हणून काय झालं, मनात आणलं तर काहीही अशक्य नाही सांगणारा 'घूमर'

अभिषेक बच्चन आणि सैयामी खेरचा घूमर सिनेमा आज १८ ऑगस्टला रिलीज झालाय
ghoomer movie review abhishek bachchan saiyami kher shabana azmi amitabh bachchan
ghoomer movie review abhishek bachchan saiyami kher shabana azmi amitabh bachchan SAKAL
Updated on

Ghoomer Movie Review: तुम्ही हॉटेल मध्ये गेलात आणि तुम्हाला नवीन पदार्थ खायची लहर आली. आता हा पदार्थ कसा निघतोय.. चांगला की वाईट? याची तुम्हाला धाकधूक. वेटर तुमच्यासमोर तो पदार्थ आणून ठेवतो. पहिलाच घास खाताना तुम्हाला अपेक्षेपेक्षा चांगली चव लागते आणि तुम्हाला समाधान मिळतं. अशीच काहीशी सुंदर अवस्था घूमर सिनेमा पाहून मिळते. (ghoomer movie review abhishek bachchan saiyami kher)

ghoomer movie review abhishek bachchan saiyami kher shabana azmi amitabh bachchan
Rajinikanth Jailer Movie : जेलरचा धिंगाणा! तर रजनीकांत झारखंडमधील राजरप्पा मंदिरात भक्तीत तल्लीन

घूमर सिनेमाच्या खोलात शिरण्याआधी सर्वप्रथम कौतुक करावं लागेल ते म्हणजे सिनेमाचे दिग्दर्शक आर. बाल्की यांचं. दिग्दर्शक हुशार असेल आणि प्रेक्षकांची नस पकडण्यात चतुर असेल तर एका छोट्याशा कथेची किती सुंदर मांडणी होऊ शकते याचं उदाहरण म्हणजे आर. बाल्की. घूमरच्या कथेचा जीव अगदी छोटासा होता. पण आर. बाल्कींनी कथेचा ज्या प्रकारे विस्तार केलाय ते निव्वळ कमाल!

घुमरच्या कथानक सांगायचं झालं तर, अनिना (सैयामी खेर) ही महिला क्रिकेटपटू. ती स्थानिक पातळीवर नाव गाजवत असते. आता तिचं स्वप्नं असतं ते म्हणजे भारतीय क्रिकेट संघात खेळण्याचं. तिच्या या स्वप्नाला तिची आजी(शबाना आझमी) आणि तिचं संपूर्ण कुटुंब सपोर्ट करत असतो. तर दुसरीकडे आहे पदम सिंग सोधी (अभिषेक बच्चन) हा एक माजी क्रिकेटपटू. जेपी भारतासाठी एकच सामना खेळला आणि नंतर दुखापतीमुळे त्याला पुन्हा संधी मिळाली नाही. ते शल्य, तो बोचरी जाणीव पदम सिंगला सतावत आहे. तो सतत दारू पितो, इतरांवर डाफरतो काहीसा विक्षिप्त वागतो. भारतीय महिला क्रिकेटसंघाचं सिलेक्शन असतं त्यावेळी पदम सिंग आणि अनिना यांची भेट होते. पण ती भेट काहीशी वेगळी असते.

अनिनाचं पुढे भारतीय क्रिकेट संघात सिलेक्शन होतं. सर्व काही सुरळीत सुरू असतं. अनिनाच्या घरचेही खुश असतात. पण अचानक होतो एक अपघात आणि त्यात अनीनाचा डावा हात कापावा लागतो. अनिनाच्या स्वप्नांचा चुराडा होतो. आणि अशावेळी पदम सिंग तिला भारतीय क्रिकेट संघात संधी मिळावी म्हणून तिला शिकवतो. आणि मग पुढे काय होतं? याची रंजक कहाणी म्हणजे घूमर.

आधीच सांगितल्याप्रमाणे सिनेमाच्या कथेचा जीव फार छोटा आहे पण ती आर. बाल्कींनी मस्त फुलवलीय. स्पोर्ट्सड्रामा असलेला हा सिनेमा इमोशन्सनी पूर्ण भरलेला आहे. इतकंच नव्हे तर मध्यंतरानंतर सिनेमात क्रिकेटची अख्खी मॅच असली तरी बाल्कींनी त्यांच्या दिग्दर्शनाने सिनेमाची रंगत तसूभरही कमी होणार नाही याची काळजी घेतलीय. काही प्रसंगात थिएटरमध्ये हमखास टाळ्या आणि शिट्ट्या पडतात.

ghoomer movie review abhishek bachchan saiyami kher shabana azmi amitabh bachchan
Chhaya Kadam: 'सैराट' फेम छाया कदम यांना मातृशोक, सोशल मिडीयावर भावुक पोस्ट करत आईला श्रद्धांजली

कलाकार हे घूमर सिनेमाची जान आहेत. सैयामी खेरने अनिनाची प्रमुख भूमिका ताकदीने उभी केलीय. सैयामीला अभिनय याशिवाय शारीरिक मेहनत ही दुहेरी कसरत सांभाळायची होती. पण तिने दोन्ही बाजू यशस्वीपणे निभावल्या आहेत. सर्वात कमाल आहे ती अभिषेक बच्चनची. अभिषेक बच्चनची आजवरची सिनेकारकीर्द आपल्याला माहीतच आहे. त्यामुळे जेव्हा पदम सिंग क्षमता असूनही संघात स्थान न मिळाल्याचं दुःख व्यक्त करतो, तेव्हा अभिषेक त्याच्या मनातल्या भावनाच प्रकट करतोय असा भास होतो. सिनेमागणीक अभिषेकचा अभिनय जास्त परिपक्व होत चाललाय. शबाना आझमी आणि छोट्याश्या भूमिकेत अमिताभ बच्चन सुद्धा कमाल काम करतात.

एकूणच दिग्दर्शक हुशार असला की मातीला कसा आकार मिळतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे घूमर. चांगला आणि दर्जेदार सिनेमा पाहण्याची आवड असेल तर घूमर तुमचं नक्की मनोरंजन करेल. फक्त आता गदर 2 आणि omg 2 च्या गर्दीत घूमरचा सिनेमागृहात कसा निभाव लागतो, हे पाहायचं आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.