Girish Oak Father Death: गिरीश ओक यांना पितृशोक! भावुक पोस्ट शेयर करत वडिलांना वाहिली श्रद्धांजली

Girish Oak Father Death:
Girish Oak Father Death:Esakal
Updated on

Girish Oak Father Death: मराठी मनोरंजन विश्वातील एक दिग्गज अभिनेते म्हणजे गिरीश ओक यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गिरीश ओक यांचे वडील रत्नाकर दिनकर ओक यांचे निधन झाले आहे. ते ९३ वर्षांचे होते.

गिरीश यांच्या वडिलांनी वीज महामंडळात शासकीय अधिकारी म्हणुन काम केले होते. त्याचा स्वभाव आणि त्यांनी दिलेल्या प्रेमामुळे, सलोख्याच्या वागणूकीमुळे त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच शोक अनावर झाला.

Girish Oak Father Death:
Prakash Raj Congratulate ISRO: आधी नावं ठेवली अन् आता लँड होताच कौतुक! चांद्रयान 3' च्या लँडिंगनंतर प्रकाश राज याचं ट्विट चर्चेत

वडिलांच्या निधनानंतर गिरीश ओक यांनी जड अंत:करणाने एक भावुक पोस्ट करत वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी वडिल रत्नाकर ओक यांचा एक फोटो शेयर केला. पोस्ट शेयर करत चाहत्यांना त्यांच्या निधनाची बातमी दिली.

Girish Oak Father Death:
Chandrayaan 3: 'इस्रो आमचा अभिमान...', चांद्रयान चंद्रावर अन् सेलेब्सचा आनंद मावेना गगनात!

या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं की, “काल माझे बाबा ती. रत्नाकर दिनकर ओक ह्यांचं वयाच्या ९३ व्या वर्षी वृध्दत्वामुळे निधन झालं. प्रत्येक मुलाचे/मुलीचे वडील हे त्याचे पहिले हिरो असतात तसेच तेही माझे होतेच.

माझ्यात ज्या काही थोड्याफार तथाकथित बऱ्या सवयी गोष्टी आहेत त्या त्यांच्यामुळेच. ते इलेक्ट्रिकल इंजीनीअर होते आणि महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात चीफ इंजीनीअर ह्या पदावर ते १९८९ साली निवृत्त झाले. त्यांनी त्यांच्या हयातीत कधीही भ्रष्टाचार केला नाही."

Girish Oak Father Death:
Mika Singh Throat Infection: गायक मिका सिंगची प्रकृती खालावली! झालं 15 कोटींचं मोठं नुकसान

पुढे ते लिहितात की, "ह्या व्यतिरिक्त त्यांना अनेक गोष्टी अवगत होत्या. त्यांना संस्कृत फ्रेंच जर्मन स्पॅनिश गुजराथी उर्दू इतक्या भाषा यायच्या ते शिवण काम आणि स्वयंपाक उत्तम करायचे कपड्यांना इस्त्री सायकल स्कूटर घड्याळं घरातल्या जवळ जवळ सगळ्याच उपयोगाच्या वस्तूंचं सर्विसींग दुरूस्ती तेच करायचे तेव्हा मी त्यांना असिस्ट करायचो त्यामुळे त्या गोष्टी मीही शिकलो.

माझी आई गमतीनी म्हणायची ती,मी आणि बहीण ह्यांना नटबोल्ट नाहीत नाहीतर त्यांनी आम्हालाही उघडून आमचं सर्विसींग केलं असतं. अर्थात ते त्यांनी न उघडताच केलं. ते बासरी आणि माउथ ॲार्गन छान वाजवायचे ते त्यांनी मला शिकवायचा प्रयत्नही केला पण मीच कंटाळा केला.

रोज नियमीत सूर्यनमस्कार आणि प्राणायाम करणं मी त्यांच्यामुळेच शिकलो. अन्नाची पाण्याची विजेची नासाडी त्यांना अजिबात खपत नसे ह्या गोष्टींची किंमत मला त्यांच्यामुळेच कळली. काय काय आणि किती सांगू, आखीर बाप बाप होता है और बेटा बेटा.

बाबा तूम्ही खूप सकारात्मक व्यासंगी आनंदी आयुष्य जगलात. तुम्ही खूप शांत संयमी होतात आणि अगदी तसेच जातानाही तुम्ही आम्हाला कोणालाही त्रास न देता शांतपणे गेलात. मला आणि सौ. पल्लवीला शेवटी तुमची सेवा करता आली हे आम्ही आमचं भाग्य समजतो. तुम्हाला सतत वेगवेगळ्या कामात व्यस्त असणं आवडायचं देव तुम्हाला तसंच व्यस्त ठेवो म्हणजे तुम्ही आनंदी रहाल. ती. बाबा शिरसाष्टांग नमस्कार”, .

गिरीश ओक यांच्या वडिलांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. दरम्यान गिरीश ओक यांचे चाहते मात्र त्यांच्यावर असलेलं वडीलांचं छत्र हरपल्याने हळहळ व्यक्त करत आहेत. त्याच्या पोस्टला प्रतिक्रिया देत त्यांच्या वडिलांना श्रध्दांजली वाहत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.