Golden Globe Awards 2024 Winners List
Golden Globe Awards 2024 Winners List Esakal

Golden Globe Awards 2024 मध्ये 'ओपनहायमर'चा डंका! ख्रिस्तोफर नोलन सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक तर.... जाणून घ्या विजेत्यांची संपूर्ण यादी

Golden Globe Awards 2024 Winners List : जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक असलेल्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड्सने 2024 च्या विजेत्यांची घोषणा केली आहे. 7 जानेवारीला कॅलिफोर्निया, यूएसए येथे या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले.
Published on

Golden Globe Awards 2024 Winners List : जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक असलेल्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड्सने 2024 च्या विजेत्यांची घोषणा केली आहे. 7 जानेवारीला कॅलिफोर्निया, यूएसए येथे या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले. यंदाचं गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स सोहळ्याचे हे 81वे वर्ष आहे.

यंदाच्या गोल्डन ग्लोबमध्ये 'ओपनहाइमर' (Oppenheimer) आणि 'बार्बी' (Barbie) या दोन्ही हॉलिवूड सिनेमांचे वर्चस्व पहायला मिळाले. क्रिस्टोफर नोलनने 'ओपेनहायमर'साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जिंकला आहे.

मार्गो रॉबीच्या बार्बी या चित्रपटाला गोल्डन ग्लोब पुरस्कार 2024 मध्ये 9 श्रेणींमध्ये सर्वाधिक नामांकन मिळाले तर ओपेनहायमरला 8 श्रेणींमध्ये नामांकन मिळाले होते. लिओनार्डो डिकॅप्रिओच्या किलर्स ऑफ द फ्लॉवर मून या चित्रपटाला 7 श्रेणींमध्ये नामांकन मिळाले. तर आता 2024 मध्ये गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स कोणी जिंकला यावर नजर टाकूया.

Golden Globe Awards 2024 Winners List
Boycott Maldives: बॉयकॉट मालदीव चलो लक्षद्वीप! अक्षय, सलमानपासून जॉन, श्रद्धापर्यंत 'या' सेलिब्रिटींनी दिला नारा...

सर्वोत्कृष्ट मोशन सिनेमा (नॉन इंग्लिश लँग्वेज) - एनाचमी ऑफ अ फॉल (नीयोन)

सर्वोत्कृष्ट विनोदवीर (टीव्ही विभाग) - रिकी गर्विस Ricky Gervais

सर्वोत्कृष्ट अभिनेता - जेरेमी ऍलन व्हाइट Jeremy Allen White

सर्वोत्कृष्ट पटकथा - जस्टिन ट्रायट, आर्थर हरारी Justin Triet, Arthur Harari - एनाटमी ऑफ अ फॉल

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - मॅथ्यू मॅकफॅडियन Matthew Macfadyen

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - रॉबर्ड डाउनी ओपनहाइमर

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - डा वाइन जॉय रैंडोल्फ

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - क्रिस्तोफर नोलन

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - एलिजाबेथ डेबिकी

सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन चित्रपट - द बॉय अँड द हेरॉन

सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री - एम्मा स्टोन

Golden Globe Awards 2024 Winners List
Merry Christmas Cast Fees: विजयपेक्षा कतरिनानं घेतलं जास्त मानधन! 'मेरी ख्रिसमस'साठी कोणत्या स्टार्सनी किती फी घेतली?

या वर्षीच्या गोल्डन ग्लोब्स नामांकनांमध्ये चित्रपट आणि टीव्हीच्या जगभरातील 27 पुरस्कार श्रेणींचा समावेश करण्यात आला होता.

यामध्ये सिनेमॅटिक आणि बॉक्स ऑफिस अचिव्हमेंट आणि टेलिव्हिजनवरील बेस्ट स्टँडअप कॉमेडियन अशा दोन नवीन श्रेणींचा समावेश करण्यात आला आहे.

या पुरस्काराची सुरुवात 1944 मध्ये झाली. सुरुवातीला हा पुरस्कार फक्त चित्रपटांसाठी दिला जायचा. 1956 मध्ये टीव्हीचा त्यात समावेश करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()