Golden Globes 2024 Nominations: गोल्डन ग्लोब्स 2024 मध्ये 'बार्बी' आणि 'ओपेनहाइमर'चा जलवा! 'या' श्रेणींमध्ये नामांकन मिळाले

गोल्डन ग्लोब पुरस्कार 2024 जाहीर करण्यात आला आहे.
Golden Globes 2024 nominations:
Golden Globes 2024 nominations:Esakal
Updated on

Golden Globes 2024 Nominations: दरवर्षी प्रमाणेच यंदाही गोल्डन ग्लोब पुरस्कार 2024 ची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्काराची प्रेक्षक आतूरतेने वाट पाहत आहेत. चित्रपट आणि टीव्ही जगतातील या सर्वात मोठ्या आणि मानाच्या पुरस्काराचे आयोजन जानेवारीत होणार आहे.

या नामांकनांची यादी 11 डिसेंबर रोजी प्रसिद्ध झाली होती. यंदाच्या गोल्डन ग्लोब पुरस्कारात 'बार्बी' आणि 'ओपेनहायमर'ने बाजी मारली आहे.

Golden Globes 2024 nominations:
Lookback 2023: 'या' मराठी चित्रपटांनी २०२३ मध्ये थेट हिंदी सिनेमांना टक्कर देऊन बॉक्स ऑफीस गाजवलं

81 व्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये कॉमेडी आणि ड्रामामध्ये बार्बी आणि क्रिस्टोफर नोलनच्या ओपेनहाइमरने नामांकन मिळवली. चित्रपटातील तीन गाण्यांना सर्वोत्कृष्ट गाणे मोशन पिक्चर श्रेणीत नामांकन मिळाले आहे.

Golden Globes 2024 nominations:
Siddharth Shukla: अभिनेता नाही तर 'या' क्षेत्रात सिद्धार्थ शुक्लाला करायचे होते करिअर

तर रायन गोस्लिंगला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठी नामांकन मिळाले. त्यामुळे ग्रेटा गेरविगला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक श्रेणीत नामांकन मिळाले. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट संगीत आणि सर्वोत्कृष्ट पटकथा या श्रेणींमध्येही नामांकन मिळाले आहे.

Best Motion Picture, Drama

ओपेनहाइमर Oppenheimer

किलरस् ऑफ द फ्लॉवर मून Killers of the Flower Moon

पास्ट लाइव्स Past Lives

मेस्ट्रो Maestro

एनाटॉमी ऑफ अ फॉल Anatomy of a Fall

जोन ऑफ इंट्रेस्ट The Zone of Interest

Best Motion Picture, Drama

बेस्ट पिक्चर- म्यूजीकल या कॉमेडी (Best Picture, Musical or Comedy)

बार्बी Barbie

पुअर थिंगस् Poor Things

होल्डओवर The Holdovers

अमेरिकन फिक्शन American Fiction

मे दिसंबर May December

एअर Air


यासोबतच बऱ्याच क्षेणीतील कलाकारांना आणि चित्रपटांना नामांकन मिळाले आहे.

Golden Globes 2024 nominations:
Randeep Hooda-Lin Laishram: रणदीप- लिनची रिसेप्शन पार्टी दणक्यात! कलाकारांची भरली जत्रा; व्हिडिओ व्हायरल

या वर्षीच्या गोल्डन ग्लोब्स नामांकनांमध्ये चित्रपट आणि टीव्हीच्या जगभरातील 27 पुरस्कार श्रेणींचा समावेश करण्यात आला आहे. ज्यात 2 नवीन श्रेणींचा समावेश करण्यात आला आहे.

एक म्हणजे सिनेमॅटिक आणि बॉक्स ऑफिस अचिव्हमेंट आणि दुसरे म्हणजे टेलिव्हिजनवरील सर्वोत्कृष्ट स्टँडअप कॉमेडियन. भारतीय वेळेनुसार सकाळी साडेसहा वाजता विजेत्यांची नावे जाहीर केली जातील. हा कार्यक्रम 7 जानेवारी रोजी लॉस एंजेलिस येथे होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.