Good Vibes Only : आयुष्यात सकारात्मकता आणणारा 'गुड वाईब्स ऑन्ली'!

आयुष्यातील वेगळ्या प्रकारची सकारात्मकता लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर पाहायला मिळणार आहे.
Good Vibes Only Web Serise Marathi OTT Plannet
Good Vibes Only Web Serise Marathi OTT Plannetesakal
Updated on

Good Vibes Only Web Serise Marathi OTT Plannet : टीव्ही मनोरंजन विश्वात गेल्या काही वर्षांपासून मराठी कंटेटनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. प्रेक्षकांना त्या मालिकांनी भुरळ घातली होती. मानवी भावभावनांचे उत्कट चित्रण मराठी मालिकांतून दिसून आले. यासगळ्यात आणखी एक सीरिज प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज आहे.

त्या मालिकेचे नाव गुड वाईब्ज असे असून ती आता लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. गुड वाईब्स ऑन्ली' या नावावरूनच कळून येतं की, ही वेबफिल्म किती वेगळ्या प्रकारचा आपल्याला सांगू पाहत आहे. आयुष्यातील हीच सकारात्मकता लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर पाहायला मिळणार आहे. सिल्क लाईट फिल्म्स प्रस्तुत, जुगल राजा निर्मित, दिग्दर्शित 'गुड वाईब्स ऑन्ली' या वेबफिल्मचे पोस्टर झळकले आहे. .

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

या मालिकेमध्ये श्रवण अजय बने, आरती केळकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यापूर्वी आरजे श्रवण आणि गायिका आरती केळकर यांनी आपल्या जादुई आवाजाची भुरळ श्रोत्यांना घातली आहे आता आपल्या उत्तम अभिनयाने ते प्रेक्षकांचे मन जिंकण्यासाठी तयार आहेत. 'गुड वाईब्स ऑन्ली'ची कथाही जुगल राजा यांचीच आहे.

दोन व्यक्तिंभोवती फिरणारी ही कथा सर्फिंग या वॉटर स्पोर्ट्सवर बेतलेली आहे. आता यात नेमकं काय पाहायला मिळणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे. या वेबफिल्मबद्दल दिग्दर्शक जुगल राजा म्हणतात, ''आपल्या आजुबाजुला सतत चांगल्या लहरींचा प्रवाह असेल तर आपले आयुष्य आपसुकच सकारात्मक होते. हेच दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या वेबफिल्ममध्ये केला आहे आणि यासाठी आम्हाला प्लॅनेट मराठीची साथ लाभली आहे. याहून चांगलं काही असूच शकत नाही. मला खात्री आहे, हा विषय प्रेक्षकांना आवडेल.''

प्लॅनेट मराठी ओटीटीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, '' आम्ही नेहमीच प्रेक्षकांना वेगवेगळे विषय दिले. या वेबफिल्मची संकल्पनाही खूप वेगळी आहे. सर्फिंग या विषयावर चित्रपट बनू शकतो, ही संकल्पनाच मुळात मराठी सिनेसृष्टीसाठी नवीन आहे. आतापर्यंत पाश्चिमात्य चित्रपटांमध्ये आपण हा विषय अनेकदा पाहिला आहे. प्रथमच हा विषय मराठी चित्रपटात हाताळण्यात आला आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.