Goregaon Filmcity: गोरेगाव फिल्मसिटीमध्ये आता रेल्वे स्टेशन होणार! सांस्कृतिक महामंडळाची मोठी घोषणा..

चित्रीकरणासाठी लागणाऱ्या रेल्वे स्टेशनचा प्रश्न अखेर मिटणार!
Goregaon Filmcity to soon get railway station set for film shoots
Goregaon Filmcity to soon get railway station set for film shoots sakal
Updated on

Mumbai Film City: भारतातील प्रमुख फिल्मसिटींपैकी एक मुंबईतील महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या गोरेगाव फिल्मसिटी बाबत एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. गेली कित्येक वर्ष ज्याची वाट कलाकार पाहत होते, तो क्षण अखेर जवळ आला आहे.

गोरेगाव फिल्मसिटी म्हणजेच दादासाहेब फाळके चित्रनगरीत रेल्वे स्टेशन व्हावे अशी कलाकारांची aniआणि निर्मात्यांची मागणी कित्येक दिवस थकीत होती. अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाली असून, लवकरच इथे रेल्वेस्टेशनची उभारणी केली जाणार आहे.

पण हे रेल्वे स्टेशन प्रवासासाठी नसून हा चित्रीकरणातील सेटचा भाग असणार आहे. असा सेट अद्याप मुंबई मध्ये कुठेही नाही, तो व्हावा यासाठी अनेक प्रयत्न सुरू होते. कारण खऱ्या रेल्वे स्थानकावर शूट करणं खूप जिखीरीचं असल्याने आता हा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे.

(Goregaon Filmcity to soon get railway station set for film shoots)

Goregaon Filmcity to soon get railway station set for film shoots
Kiran Mane: मराठी रंगभुमीला काशीनाथ घाणेकर मिळाले! हे शब्द आणि किरण माने भारावले.. काय आहे किस्सा..

गोरेगाव फिल्मसिटी मध्ये आऊटडोअर शूटिंगसाठी हा रेल्वे स्थानकाचा सेट तयार केला जाणार आहे. यासाठी लवकरच निविदा काढण्यात येणार आहे. मुंबईच्या गोरेगाव फिल्मसिटीत रेल्वे स्थानकाच्या सेटसाठी जागा देखील निश्चित करण्यात आली आहे. (bollywood news) चित्रपट निर्मात्यांच्या सततच्या मागणीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, असे संबधित अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

चित्रीकरणासाठी खऱ्या रेल्वे स्थानकांवर चित्रिकरणाची परवानगी मिळवणं अत्यंत कठीण असतं. त्यासाठी बरीच मोठी प्रक्रिया असते, अनेक अटी घातल्या जातात. म्हणून मुंबईत एका रेल्वे स्टेशनच्या सेटची खूप गरज होती. त्यासाठी निर्माते सतत मागणी करत होते.

Goregaon Filmcity to soon get railway station set for film shoots
Rubina Dilaik Accident: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या गाडीला अपघात.. नवऱ्यानं दिली हेल्थ अपडेट..

त्याच मागणीला लक्षात घेऊन हा सेट साकारण्याचा निर्णय घेतला असल्याचं महाराष्ट्र चित्रपट, रंगमंच, सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश ढाकणे यांनी सांगितलं आहे.

खऱ्या रेल्वे स्थानकांवर चित्रपटाची शूटिंग केल्यास रेल्वे वाहतुकीला त्याचा फटका बसतो, रेल्वे वाहतूक विस्कळीत होते आणि प्रवाशांची देखील गैरसोय होऊ शकते. त्यामुळे रेल्वे स्थानकावरील शूट हे सेटवर करणं जास्त सोईस्कर पडतं. म्हणून आपण हा सेट उभारत आहोत,असंही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.