Govida Birthday: आज आपल्या गोविंदाचा वाढदिवस.. त्याला आपण आपलाच म्हणतो कारण त्याच्या सिनेमाने नुसतं बॉक्स ऑफिस गाजवलं नाही तर घराघरातल्या सामान्य प्रेक्षकांचं मन जिंकलं. बॉलिवूडचा हिरो नंबर १ अशी ख्याती असणारा गोविंदा पडद्यावर दिसला की, लोकांच्या चेहऱ्यावर आनंद येतो. ९० च्या दशकात प्रत्येकाला ज्याने वेड लावलं असा गोविंदा काही सहज सुपरस्टार झाला नाही. त्याने प्रचंड स्ट्रगल केला आहे. एकेकाळी त्याच्याकडे वाणसमान भरायलाही पैसे नव्हते. आज त्याच्या वाढदिवसा निमित्त जाणून घेऊया त्याची स्ट्रगल स्टोरी..
(govinda birthday: When Govinda couldn’t afford groceries, broke down due to humiliation)
एक काळ गोविंदाने गाजवला. तो सुपरस्टार झाला अनई निर्माताही झाला. पण नियतीने त्याच्यासाठी हा प्रवास सहज ठेवला नव्हता. तो सुपरस्टार होण्याआधी त्याने खूप स्ट्रगल केला आहे. स्टारडम मिळण्यापूर्वी गोविंदा आणि त्याच्या कुटुंबीयांनी अनेक हाल सोसले. गोविंदाचे वडील अरुण अहुजा यांनी एका चित्रपटाची निर्मिती केली होती. मात्र तो चित्रपट पूर्णपणे फ्लॉप ठरल्याने त्यांना आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागलं होतं.
एका मुलाखतीत गोविंदाने कशा पद्धतीने हलाखीच्या परिस्थितीला तोंड दिलं, याविषयी सांगितलं होतं. तो म्हणाला होता, "किराणा मालाचा दुकानदार मला कित्येक तास त्याच्या दुकानात उभा ठेवायचा. कारण त्याला माहित होतं की सामानासाठी माझ्याकडे पैसै नाहीत. एकदिवस मी दुकानात जायला नकार दिला. तेव्हा आईचा बांध फुटला. ती ढसाढसा रडू लागली आणि तिच्यासोबत मीसुद्धा खूप रडलो,''
८०-९० च्या दशकात सुपरस्टार म्हणून त्याने स्वत:ची ओळख निर्माण केली. 'इल्जाम', 'राजा बाबू', 'हिरो नंबर १', 'बडे मियाँ छोटे मियाँ', 'हसीना मान जाएगी' यांसारखे चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजले. विनोदाचं अचूक टायमिंग आणि उत्कृष्ट नृत्यकौशल्य यांमुळे गोविंदाने अनेकांची वाहवा मिळवली.
एका मुलाखतीत गोविंदा म्हणाला होता, "तुम्ही मला कधीच कोणाविरोधात बोलताना पाहणार नाही. पण इतर लोकं माझ्याविरोधात खूप काही बोलतात. मी इतरांच्या कामाबद्दल कधीच वाईट बोलत नाही. कारण मी प्रत्येक व्यक्तीच्या मेहनतीचा आदर करतो. गेल्या १४-१५ वर्षांत मी खूप पैशांची गुंतवणूक केली होती आणि त्यातीत जवळपास १६ कोटी रुपयांचा तोटा मला झाला. इंडस्ट्रीतील काही लोकांनी मला वाईट वागणूक दिली होती. माझ्या चित्रपटांना थिएटर्स मिळत नव्हते आणि त्या लोकांना माझं करिअर उध्वस्त करायचं होतं. पण मी हार मानली नाही." अशी व्यथा त्याने मांडली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.