गोविंदा म्हणजे अभिनय,नृत्य आणि विनोदाची उत्तम जाण असलेला एक हरहुन्नरी अभिनेता. अनेक वर्ष त्यांन मोठ्या पडद्यावर राज्य केलं. 'खान' मांदियाळीतही त्याचं असं प्रस्थ होतंच. त्याच्या गाण्यांवर खास नाचण्यासाठी लोक थिएटरमध्ये जायची. त्यामुळे कथानकात बाष्कळपणा असला तरी गोविंदाच्या सिनेमातील गाण्यांची जादू सिनेमाला बॉक्सऑफिसवर दमदार कलेक्शन करून द्यायची. तो आता अभावानेच सिनेमांमध्ये दिसतो. २०१९ मध्ये त्याचा 'रंगीलाराजा' हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. आता त्याच्याकडच्या सिनेमांची रांग कमी व्हायला कारण 'तोच' ठरला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण गोविंदा हा नेहमी सेटवर खूप उशिरा पोहोचायचा. सकाळी ७ ची वेळ दिली की गोविंदा दुपारी १२ वाजता पोहोचायचा. अनेक तक्रारी त्याच्याविरोधात या उशिरा येण्यानेच व्हायच्या. बरं मग त्याच्यासोबतच संजय दत्त काम करीत असो,सलमान खान की दस्तुरखुद्द अमिताभ बच्चन. तो आपल्या नियमावलीवर ठाम राहिला आणि यामुळे त्याच्याकडे येणारे सिनेमे कमी झाले. म्हणून तर त्याच्याच वयाच्या मागची पुढची खान मंडळी अजुनही सिनेइंडस्ट्रीवर राज्य करतायत आणि तो मात्र हळूहळू 'आऊट' होत गेला.
पण हार मानेल तो गोविंदा कसला. 'हिरो नंबर १' एकेकाळी उगीच नाही त्याच्या कोणत्याही बातमीच्या आधी म्हटलं जायचं. आता गोविंदाने आपल्यातील काही कलांना अधिक वाव द्यायचं ठरवलंय. तो उत्तम नाचतो हे तर माहीत आहे आपल्याला. पण तो ब-यापैकी गातोही बरं का. त्याने म्युझिक व्हिडीओच्या माध्यमातनं दणक्यात एंट्री केली आहे. बरं यासाठी गाणं त्याने स्वत: लिहीलंय,गायलंय आणि त्यावर नृत्याभिनयही केलाय. काही दिवसांपूर्वी त्यानं त्याचं पहिलं गाणं प्रदर्शित केलं होतं. ज्याला चांगला प्रतिसादही मिळाला. ज्याचे शब्द होते 'टिप टिप पानी बरसा'. लोकांनी 'कतरिनापेक्षा छान नाचलायस' म्हणून कमेंट देत कतरिनाला या गाण्यावरनं ट्रोल केलं होतं.
आता पुन्हा गोविंदा त्याचा दुसरा म्युझिक व्हिडीओ घेऊन आपल्या भेटीस येतोय. या गाण्याचे बोल आहेत 'चष्मा चढाके'. हे गाणंही त्याने लिहिलंय आणि गायलंय. पण एक गोष्ट लक्षात येईल की या दोन्ही गाण्यात गोविंदासोबत नाचणा-या दोन्ही कलाकार या वयाने विशीतल्या असल्या तरी साठीच्या वेशीवर उभ्या असलेल्या गोविंदा पुढे मात्र नाचताना फीक्या वाटतायत. आजही गोविंदाची जादू आणि त्याच्यातील नाचण्याची धमक कायम आहे. गोविंदाने सोशल मीडियावर या गाण्याचा टीझर शेअर करून सूचित केलंय की येत्या ६डिसेंबरला हा म्युझिक व्हिडीओ प्रदर्शित केला जाईल. पाहूया या गाण्याची खास झलक.
गोविदाने गाणं शेअर केल्यानंतर फॅन्सनी त्याच्यावर वेगवेगळ्या कमेंट्स देऊन कौतूक केलंय. कोणी म्हटलंय '५०० शे करोडं घ्या, पण गाण लवकर प्रदर्शित करा'. 'वाट का पहायला लावताय'. कुणी 'अभिनंदन' म्हटलंय. पण काही ट्रोलर्सनी गाविंदाच्या वयावरनं त्याची खिल्ली उडवत 'अंकल' म्हटलंय. तर त्याला गोविंदाच्या फॅन्सने त्याच्या कडक भाषेत प्रतिउत्तर दिलंय,'सिनेमातनं अक्षय,सलमान,शाहरुखने काही केलं तर चालतं, मग गोविंदाने केलं तर बिघडलं कुठे'. यावर गोविंदाचे फॅन्स अजूनही कमी झालेले नाहीत याची प्रचिती येते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.