Grammys 2024 : जगभरातील संगीतप्रेमींसाठी मोठी पर्वणी असलेल्या ग्रॅमी पुरस्काराची घोषणा नुकतीच झाली आहे. हा शो कधी, कुठे आणि का पाहता येईल याविषयी आपण या बातमीतून जाणून घेणार आहोत. यावेळचा ग्रॅमी हा वेगवेगळ्या अर्थानं वैशिष्टयपूर्ण असणार आहे. त्यामुळे त्याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये हा सोहळा पार पडणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर या सोहळ्याचे प्रक्षेपण होणार आहे. ट्रेवर नोहा हा ग्रॅमी पुरस्काराचे होस्टिंग करणार आहे. त्याला बेस्ट कॉमेडियनचे ग्रॅमीचे नॉमिनेशन देखील आहे. Grammy Awards 2024 New Categories Nominees
कुठे आणि केव्हा पाहाल?
४ फेब्रुवारी रोजी (भारतीय प्रमाणवेळेनुसार ५ फेब्रुवारी रोजी) सकाळी साडेसहा वाजल्यापासून (IST) या सोहळ्याला सुरुवात होणार आहे. या सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण त्याच दिवशी सीबीसी आणि पॅरामाउंटच्या वेबसाईटवरुन रात्री आठ वाजल्यापासून पाहता येणार आहे. तसेच हुलू लाईव्ह टीव्ही, युटयुब टीव्ही, फुबो टीव्ही, यावरही हा सोहळा पाहता येईल.
कोण आहेत यावेळचे टॉप नॉमिनिझ?
एसझेडएला आतापर्यत नऊपेक्षा जास्त नामांकनं मिळाली आहेत. त्यात रेकॉर्ड ऑफ द इयर, साँग ऑफ द इयर आणि बेस्ट आर एँड बी परफॉर्मन्स यांचा समावेश आहे. व्हिक्टोरिया मोनेट आणि फोबे ब्रिजर्स यांना देखील सात नामांकनं मिळाली आहे.
नवीन कॅटगिरी कोणत्या आहेत...
यंदाच्या ६६ व्या ग्रॅमीमध्ये कोणकोणते पुरस्कार असणार याविषयी अनेकांना उत्सुकता होती. त्याविषयी महत्वाची माहिती समोर आलेली आहे. त्यात तीन नव्या कॅटगिरीची भर पडली आहे. बेस्ट पॉप डान्स रेकॉर्डिंग, बेस्ट आफ्रिकन म्युझिक परफॉर्मन्स आणि बेस्ट अल्टरनेटिव्ह जाझ अल्बम यांचा समावेश आहे. तीन तासांचा हा ग्रॅमी सोहळा एपीपी (द असोसिएट प्रेस), युट्युब, ट्विटर आणि एपी वेबसाईडवर प्रेक्षकांना हा सोहळा पाहता येणार आहे.
काय आहेत महत्वाचे बदल...
ग्रॅमीनं काही वर्षात महत्वाचे बदल केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनी नवकलाकारांना संधी देण्यासाठी विविध कॅटगिरी सुरु केल्या आहेत. काही वर्षात आफ्रिकन म्युझिक परफॉर्मन्स नावाची वेगळी कॅटगिरी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांचा ग्रॅमी पुरस्कार सोहळ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्याला मिळणारा प्रतिसाद यात प्रचंड फरक पडल्याचे सांगण्यात येते.
एआय नावाच्या तंत्रज्ञाननं अनेक क्षेत्रांमध्ये मोठी कामगिरी केली आहे. म्युझिक फिल्डमध्ये देखील एआयची कामगिरी प्रभावित करणारी आहे. अशात ग्रॅमीमध्ये एआयचा समावेश करण्यात आला आहे. मात्र अद्याप त्याला कोणत्याही प्रकारचे पारितोषिक किंवा पुरस्कार मिळालेला नाही.
यंदाच्या सोहळ्यामध्ये पाश्चिमात्य संगीत विश्वातील अनेक प्रसिद्ध सेलिब्रेटींचे सादरीकरण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ग्रॅमीच्या रेड कार्पेटवर कुणाचा परफॉर्मन्स होणार, कोण बाजी मारणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. ६६ व्या ग्रॅमी पुरस्कारामध्ये जगभरातील विविध देशांमधून नामांकन आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.