Oscars 2023 : 'छेल्लो शो' भारताकडून ऑस्करसाठी अधिकृत एन्ट्री

गुजरात सरकारनं दिली माहिती
Chello Show
Chello Show
Updated on

नवी दिल्ली : गुजराती सिनेमा छेल्लो शो हा भारताकडून ऑस्कर 2023 साठी अधिकृत एन्ट्री असणार आहे. गुजरात सरकारकडून ही माहिती देण्यात आली आहे. एएनआयनं याबाबत वृत्त दिलं आहे. ऑस्करच्या शर्यतीत राजामौली यांच्या RRR सिनेमची चर्चा होती, पण आता हा सिनेमा या शर्यतीतून मागे पडल्याचं स्पष्ट झालं आहे. (Gujarati film Chhello Show is India official entry for Oscars 2023)

फिल्म फेडरेशन ऑफ इंडियानं पुढील वर्षी होणाऱ्या अॅकेडमी अॅवॉर्डसाठी अर्थात ऑस्करसाठी गुजराती सिनेमा छेल्लो शो ची निवड केली आहे. बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म या कॅटेगिरीसाठी भारताकडून हा सिनेमा पाठवण्यात येणार आहे.

Chello Show
राहुल गांधी अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची शक्यता नाही - काँग्रेस सूत्र

पान नलिन दिग्दर्शित या सिनेमात भाविन रबारी, भावेश श्रीमाली, ऋचा मीणा, दीपेन रावल आणि परेश मेहता हे प्रमुख भूमिकेत आहेत. या सिनेमाचा प्रिमियर २०२१ मध्ये ट्रिबेका फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाला होता. ऑक्टोबर २०२१ मध्ये छेल्लो शो नं ६६ व्या वैलाडोलिड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये गोल्डन स्पाईक अॅवॉर्ड जिंकला होता.

दरम्यान, प्रसिद्ध चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या सिनेमांचं पोस्टर शेअर करत 'RRR' नाही, 'द काश्मिर फाईल्स' नाही तर 'लास्ट फिल्म शो' अर्थात 'छेल्लो शो' हा भारताकडून ऑस्करसाठी पाठवण्यात येणारा अधिकृत सिनेमा आहे, असं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.