Manav Kaul: गुलशन कुमार यांच्या हत्येत मानव कौलला पोलीसांनी पकडलेलं, बघा काय आहे प्रकरण

आता गुलशन कुमार यांच्या हत्येचा संबंध थेट मानव कौलशी जोडला जातोय. काय आहे प्रकरण..
gulshan kumar murder case police arrest manav kaul
gulshan kumar murder case police arrest manav kaul SAKAL
Updated on

Manav Kaul Gulshan Kumar News: अभिनेता मानव कौल सध्या चर्चेत आलाय. तसं आपण मानव कौलला काय पो चे, सिटीलाईट, द फेम गेम, नेलपॉलिश, तुम्हारी सुलु अशा सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय.

आता गुलशन कुमार यांच्या हत्येचा संबंध थेट मानव कौलशी जोडला जातोय. काय आहे प्रकरण.. गुलशन कुमार आणि मानव कौल यांचा नेमका संबंध काय होता जाणून घेऊ..

(gulshan kumar murder case police arrest manav kaul)

gulshan kumar murder case police arrest manav kaul
Surekha Punekar: लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा राष्ट्रवादीला रामराम! आता हैद्राबादच्या....

अलीकडेच एक जुनी गोष्ट आठवत मानव कौलने एका मुलाखतीत खुलासा केला, तुम्हारी सुलू'च्या संदर्भात मानव जेव्हा टी-सीरिजच्या ऑफिसमध्ये पोहोचला तेव्हा गुलशन कुमार यांचा फोटो पाहून त्याला धडकी भरली होती.

टी-सीरीजच्या ऑफिसमध्ये गुलशन कुमार यांचा मोठा फोटो आहे. तो फोटो पाहून मानवला त्याचे जुने वेदनादायी दिवस आठवले.

गुलशन कुमार यांच्या हत्येप्रकरणी मानव कौल याला अटक करण्यात आली होती. वास्तविक मानवला चित्रपटात काम करून मोठे नाव बनवायचे होते.

पण करियरच्या सुरुवातीलाच त्याला पोलिसांनी उचलून धरलं. यावेळी पुढचं सगळं आयुष्य मानवला धूसर दिसत होतं. पुढची सगळी मेहनत वाया जाईल असं त्याला वाटलं.

मानवच्या म्हणण्यानुसार, त्यावेळी मानव एका खोलीत अनेक मुलांसोबत राहत असे. हलाखीच्या परिस्थितीमुळे सर्व मुलं पैसे वाचवण्यासाठी उशिरापर्यंत जागे राहायची.

त्याच्यासोबत उपस्थित असलेल्या बाकीच्या मुलांनाही चित्रपटात काम करायचे होते. प्रत्येकजण कामाच्या शोधात स्टुडिओच्या फेऱ्या मारायचा.

gulshan kumar murder case police arrest manav kaul
Asit Modi FIR: सर्वांसमोर माझी माफी मागा नाहीतर... जेनिफर आणि असित मोदींमधला वाद टोकाला

त्यावेळी गुलशन कुमार यांच्या हत्येच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला होता. यादरम्यान पोलिसांनी सर्वांना चौकशीसाठी उचलण्यास सुरुवात केली.

एका रात्री मानवला सुद्धा पोलिसांनी उचलून नेले. मात्र, चौकशी केल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले. पण गुलशन कुमार यांच्या हत्येमुळे मानवला मात्र पोलीस घेऊन गेले होते आणि आयुष्यात पहिल्यांदा मानवने पोलीस स्टेशन पाहीलं, ही आठवण त्याला वेदना देते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()