hansal Mehta news
hansal Mehta news team esakal

स्कॅम 1992 चे दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या वडिलांचे निधन

मेहता यांनी वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना लिहिलं आहे की....
Published on

मुंबई - बॉलीवूडचे प्रसिध्द दिग्दर्शक हंसल मेहता (Hansal Mehta) यांचे वडिल दीपक सुबोध मेहता (Deepak Mehata) यांचे निधन झाले आहे. हंसल (Hansal) यांनी याबाबतची माहिती सोशल मीडियावर (social media) शेअर केली आहे. त्यांच्या वडिलांच्या निधनाचे वृत्त ऐकताच बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी त्यांचे सांत्वन केले आहे. (hansal mehta emotional note as his father passes away celebrities pay condolences)

हंसल मेहता (Hansal Mehata) यांच्या वडिलांच्या निधनाचे कारण अद्याप समजलेले नाही. त्याबाबत हंसल (Hansal) यांनी कुठलीही माहिती दिलेली नाही. हंसल यांनी त्या पोस्टच्या माध्यमातून आपल्या वडिलांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांच्या आठवणींना त्यांनी उजाळाही दिला आहे. त्यांनी लिहिलं आहे की, जगातला सर्वात सुंदर माणूस. (Most handsome person)

यावेळी हंसल मेहता यांनी वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना लिहिलं आहे की, मी नेहमी असा विचार करायचो की, माझे वडिल हे माझ्यापेक्षा जास्त काळ जगतील. मात्र नियतीच्या मनात काही वेगळे होते. मी चूकीचा होतो. तुम्ही आता ज्याठिकाणी आहात तिथे तुम्ही मला भेटाल. आतापर्यत मी भेटलेल्या व्यक्तींपैकी सर्वात उदार मनाचं व्यक्तिमत्व म्हणून तुमच्या नावाचा उल्लेख करता येईल.

hansal Mehta news
रँचो, फरहान आणि राजु तिघेही होते 'टल्ली'
hansal Mehta news
सुशांतला दिले जाणारे ड्रग्स पुरवणारा सापडला? NCBची कारवाई

कुठलीही अट न ठेवता तुम्ही माझ्यावर प्रेम केले. त्यासाठी तुम्हाला धन्यवाद द्यावे लागतील. तुम्ही माझे हिरो आहात. हे मला सगळ्यांना सांगायला हवे. असेही मेहता यांनी लिहिलं आहे. त्यांच्या या पोस्टला फरहान अख्तर, पूजा भट यांच्याबरोबर अनेक सेलिब्रेटींनी कमेंट केली आहे. स्कॅम 1992 चा अभिनेता प्रतिक गांधीने देखील मेहता यांच्या वडिलांना श्रध्दांजली वाहिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.