Hansika Motwani: बालकलाकार म्हणून ग्लॅमर इंडस्ट्रीत पदार्पण करणारी हंसिका मोटवानीनं आपल्या करियरमध्ये अनेक प्रोजेक्ट्समध्ये काम केलं आहे. हंसिकानं खूप लहान वयात टेलीव्हिजन आणि बॉलीवूड अशा दोन्ही इंडस्ट्रीत काम करायला सुरुवात केली.
जसं ती थोडी मोठी झाली तिनं थेट तेलुगू इंडस्ट्रीमध्येही पाऊल ठेवलं. हंसिका कायम चांगल्या अभिनयामुळे चर्चेत राहिली आहे, पण यासोबतच तिच्यावर हार्मोनल ग्रोथ होण्यासाठी इंजेक्शन घेतल्याचा आरोपही केला गेला. (Hansika Motwani opens up on rumours of hormonal injection)
शाका लाका बूम बूम शो मधनं बालकलाकार म्हणून प्रसिद्ध झालेल्या हंसिकानं हृतिक रोशनसोबत कोई मिल गया सिनेमात काम केलं. जसे जसे हंसिकाजवळ प्रोजेक्ट्स येत गेले तसतसं तिचं स्टारडम वाढतच गेलं.
काही दिवसांच्या ब्रेकनंतर हंसिकानं हिमेश रेशमियाच्या आप का सुरूर या म्युझिक अल्बमध्ये काम केलं. त्यावेळी तिला पाहून लोक हैाराण झाले,आणि तिथनंच सुरू झाला हार्मोनल इंजेक्शन घेण्याच्या आरोपाचा सिलसिला. बोललं जाऊ लागलं की मोठं दिसण्यासाठी हंसिकाला तिच्या आईनं इंजेक्शन दिले.
बालकलाकार ते मुख्य अभिनेत्री म्हणून इंडस्ट्रीत पदार्पण करणाऱ्या हंसिकानं आणि तिच्या आईनं आता सर्व आरोपांचे खंडन केले आहे. बॉलीवूड लाइफच्या बातमीनुसार,अभिनेत्रीची आई मोना मोटवानीनं या आरोपांना धुडकावून लावलं आहे.
तिनं म्हटलं आहे, हाडांची पटापट वाढ करणारी कोणती इंजेक्शन असतात का. कोणतीही आई असं का करेल. जे लोक तुमच्या यशावर जळतात,ते पैसे देऊन अशा बातम्या छापतात,आणि आपल्याला कळत नाही यामागे कोण आहे. या बातम्यांमध्ये काहीच तथ्य नाही..म्हणूनव आमच्याकडूनही कधीच या बातम्यांना लपवलं गेलं नाही.
यानंतर हंसिकानं म्हटलं की तिला सुईची भिती वाटते. सूईच्या भीतीमुळेच तिनं आतापर्यंत अंगावर कधी टॅटू बनवून घेतला नाही. ती म्हणाली की लोक तिच्या प्रगतीवर जळतात. ती काहीतरी योग्य करतेय म्हणूनच असं सगळं घडत आहे आणि लोक तिच्याविषयी नको नको ते बोलताना दिसत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.