Janhvi Kapoor: माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत जोडलं गेलं नाव, वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असणारी जान्हवी आहे कोट्यवधींची मालकीण

Janhvi Kapoor: आज जान्हवीच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात तिच्या चित्रपटांबद्दल आणि संपत्तीबाबत...
 Janhvi Kapoor
Janhvi Kapoor esakal
Updated on

Happy Birthday Janhvi Kapoor: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूरचा (Janhvi Kapoor) आज वाढदिवस आहे. जान्हवीचे चाहते सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन तिला शुभेच्छा देत आहेत. जान्हवी ही तिच्या चित्रपटांबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. अनेक वेळा सोशल मीडियावर जान्हवीच्या डेटिंगच्या चर्चा होत असतात. आज जान्हवीच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात तिच्या चित्रपटांबद्दल आणि संपत्तीबाबत...

'धडक' मधून केलं पदार्पण

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि निर्माता बोनी कपूर यांची मुलगी जान्हवीनं बॉलिवूडमध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे. जान्हवी कपूरने 2018 साली धडक या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. जान्हवी तिच्या ग्लॅमरस स्टाईलनं आणि अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते.

जान्हवी आहे कोट्यवधींची मालकीण

बॉलिवूड लाईफनुसार, जान्हवी ही जवळपास 58 कोटींची मालकीण आहे. जान्हवी ही एका चित्रपटासाठी जवळपास पाच कोटींचे मानधन घेते. जान्हवी ही चित्रपटांसोबतच जाहिरातीमध्ये देखील काम करते.

माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत जोडलं गेलं नाव

सुशील कुमार शिंदे यांचा नातू शिखरचं नाव जान्हवी कपूरसोबत अनेकदा जोडलं जातं. जान्हवीला अनेकवेळा शिखरसोबत स्पॉट करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी जान्हवीनं कॉफी विथ करण या शोमध्ये हजेरी लावली होती. 'तुझ्या फोनच्या स्पीड डायल लिस्टमध्ये 3 टॉप कॉन्टॅक्ट कोणाचे आहेत?', असा प्रश्न तेव्हा करणनं जान्हवीला विचारला. या प्रश्नाचं उत्तर देताना जान्हवीनं शिखरचं नाव घेतलं. शिखर आणि जान्हवी यांनी अजून त्यांच्या नात्याबद्दल कोणतीही माहिती चाहत्यांना दिलेली नाही.

 Janhvi Kapoor
Janhvi Kapoor - Sara Tendulkar: बॉयफ्रेंडसोबत दिसताच जान्हवी कपूरने केलं साराला अनफॉलो! नेमकं काय झालं?

जान्हवी ही मिली, बवाल, गुडलक जेरी, गुंजन सक्सेना आणि रुही या चित्रपटांमध्ये जान्हवीनं काम केलं. तसेच मिली या चित्रपटातील जान्हवीच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.

जान्हवीचे आगामी चित्रपट

जान्हवी कपूर ही लवकरच 'देवरा' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती ज्युनियर एनटीआरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटाशिवाय जान्हवी 'मिस्टर अँड मिसेस माही' आणि 'उलज' या चित्रपटांमध्येही काम करणार आहे. जान्हवीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.