मुंबई- साऊथ सिनेमाचा प्रसिद्ध अभिनेता यश आज त्याच्या वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म ८ जानेवारी १९८६ ला झाला. खूप कमी जणांना माहितीये की यशचं खरं नाव नवीन कुमार गौडा आहे. कन्नड सिनेमामध्ये त्याने कमी वेळात खूप मोठं नाव कमावलं आहे. यश एक मध्यम वर्गीय कुटुंबातील आहे. त्याचे वडिल बसचालक होते तर आई गृहिणी होती.
यशने २००८ मध्ये रिलीज झालेला कन्नड सिनेमा 'मोगिना मनसु' सिनेमाने त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. या सिनेमासाठी त्याला सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. या सिनेमाआधी देखील त्याने एका टीव्ही सिरिअलमध्ये काम केलं होतं. २०१० मध्ये रिलीज झालेला यशचा कन्नड सिनेमा 'मोदालासाला' त्याच्या करिअरचा सगळ्यात बडा हिट सिनेमा होता.
२०१४ मध्ये रिलीज झालेला 'मिस्टर एंड मिसेस रामचारी' यशसाठी सगळ्यात मोठा सिनेमा ठरला. या सिनेमामाध्ये राधिका पंडित यशसोबत मुख्य भूमिकेत होती. २०१६ मध्ये यशने याच सिनेमातील मुख्य भूमिका साकारलेली अभिनेत्री राधिकासोबत लग्न केलं. राधिका देखील साऊथची टॉपची अभिनेत्री आहे. २००८ पासून ते २०१६ पर्यंत यशने खूप सिनेमे केले. कन्नड सिनेमामध्ये त्याला ओळख मिळाली होती मात्र त्याचं नशीब चमकलं ते 'केजीएफ' या सिनेमामुळे.
२०१८ मध्ये रिलीज झालेला 'कोलार गोल्ड फील्ड्स चॅप्टर १' यशच्या करिअरमधील सगळ्यात मोठा सिनेमा ठरला. केवळ साऊथ सिनेमामध्येच नाही तर या सिनेमामुळे यशने प्रत्येक भाषेतील सिनेप्रेमींच्या मनात घर केलं. 'केजीएफ १' सिनेमाची कहाणी रॉकी भाई नावाच्या पात्राची कहाणी आहे जे यशने साकारलं आहे. या सिनेमाचा ऍक्श सिक्वेन्स कमाल आहे. सिनेमाची कहाणी देखील प्रेक्षकांच्या मनाला भावते. यशच्या वाढदिवसानिमित्त खास या सिनेमाच्या दुस-या चॅप्टरचा टिझर रिलीज करण्याचा निर्णय पहिलेच घेतला गेला होता. या सिनेमाच्या दुस-या भागात संजय दत्त खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
happy birthday yash know about some esser known facts about rocking star yash
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.