Viral Video: 'हर-हर शंभू!' गाणारी शाळकरी मुलगी 'अभिलिप्सा पंड्डा' आहे कोण?

सोशल मीडियावर व्हायरल सध्या एका शाळकरी मुलीचं गाणं मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. भगवान शंकराची आराधना करणारं ते गाणं नेटकऱ्यांच्या विशेष पसंतीचे ठरले आहे.
Viral Video of abhislipsha news
Viral Video of abhislipsha news esakal
Updated on

Abhilipsha Panda: - सोशल मीडियावर व्हायरल सध्या एका शाळकरी मुलीचं गाणं मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. भगवान शंकराची आराधना करणारं ते गाणं नेटकऱ्यांच्या विशेष पसंतीचे ठरले आहे. त्या गाण्याला लाखो व्ह्युज मिळाले आहेत. (viral video news) कित्येकांनी त्या लहान मुलीचे कौतूकही केलं आहे. शिवशंकराचे गाणे गात लाखो भाविकांना आपलसं करणारी ती मुलगी कोण आहे असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. आपण तिच्याविषयी जाणून घेणार आहोत. त्या (social media news) मुलीचे नाव अभिलिप्सा पंड्डा असे आहे. दोन महिन्यांपूर्वी (abhilipsa panda) सोशल मीडियावर अपलोड करण्यात आलेल्या त्या गाण्यानं तर आता मोठ्या प्रमाणावर नेटकऱ्यांची दाद मिळवली आहे.

जुनच्या पहिल्या आठवड्यापासून ते गाणं सोशल मीडियावर चर्चेत आलं. त्यानंतर आता ते सर्वाधिक ऐकलं आणि पाहिलं गेलेलं गाणं असल्याचे सांगितले जात आहे. आता प्रत्येकाच्या मोबाईलवर ते गाणं वाजत आहे. त्यामुळे ते गाणं गाणारी कोण असा प्रश्न नेटकऱ्यांचा पडणं साहजिकच म्हणावे लागेल. अभिलिप्साला मिळालेली लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अभिलिप्सा ही कोण आहे, ती काय करते हे आपण जाणून घेऊयात. सध्या आपल्या गायकीनं लाखो श्रोत्यांचे लक्ष वेधून घेणारी अभिलिप्साचं आणि संगीताचं नातं फार पूर्वीपासून आहे. अभिलिप्सा ही उडियामध्ये राहणारी आहे.

अभिलिप्सा ही आई वडिल आणि आपल्या बहिणीसोबत राहते. तिचे आजोबा हे एक उत्तम पेटीवादक होते. त्यांचे पेटीवादन उडियातील पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध होते. आपल्या आजोबांचा वारसा आता अभिलिप्सानं पुढे सुरु ठेवला आहे. तिनं आपल्या आजोबांकडून संगीताचे धडे गिरवले आहे. फार कमी वयात तिनं स्वताची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिलिप्सानं संगीताचे शास्त्रीय संगीत देखील घेतले आहे.

Viral Video of abhislipsha news
Ranveer Singh : इंदौरमध्ये रणवीरसाठी लोकं कपडे गोळा करताहेत!

अभिलिप्सा ही गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या संगीत स्पर्धा, महोत्सव यामध्ये सहभागी होत आहे. त्यात तिला यशही मिळाले आहे. त्यामुळे आसपासच्या शहारांमध्ये तिची लोकप्रियता वाढली आहे. तिनं आपल्या करिअऱची सुरुवात मंजिल केदारनाथ नावाच्या एका अल्बमपासुन केली होती. त्याला श्रोत्यांचा मोठ्या प्रमाणवर प्रतिसाद मिळाला. याशिवाय तिनं तेलुगू भाषेत देखील एक अल्बम रेकॉर्ड केला त्याचीही चर्चा आहे. यासगळ्यात जेव्हा अभिलिप्सानं महादेवांचे हर हर शंभु गायले तेव्हा मात्र ती प्रकाशझोतात आली. अभिलिप्सानं संगीताबरोबच मार्शल आर्टसचे देखील शिक्षण घेतले आहे.

Viral Video of abhislipsha news
Tiger-Disha Breakup: टायगर - दिशाचं 'ब्रेक अप' सहा वर्षाचं प्रेमं आटलं!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.