Ravi Kishan News: आजवर अनेक अभिनेत्रींना कास्टिंग काऊचचा धक्कदायक अनुभव आलाय. पण अभिनेत्यांना सुद्धा कास्टिंग काऊचचा अनुभव येतो हि फार दुर्मिळ गोष्ट.
अशातच बॉलिवूड आणि भोजपुरी सिनेमांमधील लोकप्रिय अभिनेते रवी किशन यांनी त्यांना आलेल्या कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव सर्वांना सांगितलाय. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
(He invited me for coffee and... Ravi Kishan Shocking Casting Couch Experience)
रवी किशन नुकतंच रजत शर्माचा शो 'आप की अदालत'मध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी रवी किशन यांनी खुलासा केला कि- "होय, कास्टिंग काऊच घडते आणि इंडस्ट्रीत असा प्रकार सर्रास चालतो. पण कसा तरी मी या प्रकारातून पळून जाण्यात यशस्वी झालो.
माझे काम प्रामाणिकपणे करावे, हे माझ्या वडिलांनी मला शिकवले. मला कधीच शॉर्टकट घ्यायचा नव्हता. माझ्या आत टॅलेंट आहे हे मला माहीत होते."
रवी किशन पुढे म्हणाला - "मी त्या व्यक्तीचे नाव घेऊ शकत नाही कारण ती आता एक मोठी व्यक्ती बनली आहे. तो मला म्हणाला, 'रात्री कॉफी घ्यायला घरी या. मला वाटले की ही कॉफी सकाळी पिण्याची गोष्ट आहे.
म्हणून मला त्या व्यक्तीच्या घरी कॉफी प्यायला जाणं योग्य वाटलं नाही. त्या व्यक्तीचा कॉफीला बोलावण्याचा उद्देश मला योग्य वाटला नाही. म्हणून मी रात्री त्या व्यक्तीच्या घरी गेलो नाही."
'बिग बॉस' आणि 'झलक दिखला जा' सारख्या रिअॅलिटी टीव्ही शोमध्ये दिसलेल्या रवीने सांगितले की, मला सिनेमांमध्ये काम करण्याची ऑफर देण्यात आली होती.
पण कोणत्याही वाईट मार्गाने मला सिनेमात प्रवेश करायचा नव्हता. मनोरंजन विश्वात या सामान्य घटना आहेत पण या विचित्र परिस्थितीतून पाल काढण्यात रवी यशस्वी झाला आणि पुढचा अनर्थ टळला.
रवी किशन यांनी आजवर बॉलिवूड आणि भोजपुरी सिनेमांमध्ये लोकप्रिय भूमिका साकारल्या आहेत.
'आर्मी', 'फिर हेरा फेरी', 'तेरे नाम', 'लक', 'एजंट विनोद', 'मुक्काबाज', तनु वेड्स मनु अशा सिनेमांमध्ये रवी किशन यांनी अभिनय केलाय.
गेल्या वर्षी रिलीज झालेल्या 'लव्ह यू लोकतंत्र' आणि नेटफ्लिक्स वेब सीरिज 'खाकी: द बिहार चॅप्टर'मध्ये रवी किशन दिसले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.