Ravindra Mahajani Passed Away News: मराठी मनोरंजन विश्वात आज धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनींचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झालं. रविंद्र यांचा मृतदेह घरातच होता.
२ दिवसानंतर शेजाऱ्यांना वास आला आणि त्यांनी पोलीसांकडे तक्रार केली. शेवटी पोलीसांनी दार तोडल्यावर रविंद्र महाजनी आत मृतावस्थेत आढळले. अखेर रविंद्र महाजनी ज्या सोसायटीत राहत होते तिथल्या रहिवाश्यांनी या घटनेबद्दल मौन सोडलंय.
(He used to live alone and no one came to meet him shocking revelation of Ravindra Mahajani neighbors)
शेजारी फॅन पण त्यांना काहीच माहित नाही...
पोलिसांना दुर्गंधी येत सुरुवातीला माहिती ज्या शेजाऱ्यांनी दिली त्यांना जेव्हा कळलं शेजारच्या खोलीत रविंद्र रहायचे तेव्हा त्यांनी हळळ व्यक्त केली.
रवींद्र महाजनी हे गेल्या सात ते आठ महिन्यापासून घरात एकटेच राहत होते. त्यांना कोणी भेटायला येत नव्हतं. ते सुद्धा खुप कमी लोकांशी बोलत असत. अशी माहिती शेजारी राहणाऱ्या प्राजक्ता पुजारी यांनी दिली आहे.
तर प्राजक्ता यांच्या सासू यांनी महाजनी यांच्या मोठ्या फॅन आहेत. रविंद्र यांच्या अशा जाण्याने त्यांना खूप दुःख झालं आहे, ते एकटेच राहत होते, त्यांच्याजवळ कोणी नव्हतं. अशा दुर्दैवी अवस्थेत त्यांचा मृत्यू झाला यासारखी वाईट कुठलीच गोष्ट नाही’ असं त्यांनी म्हटलं आहे.
रोज बोलणारे रविंद्र अचानक गप्प झाले
याशिवाय रविंद्र ज्या सोसायटीत रहायचे तिथे कचरा गोळा करण्यासाठी येणाऱ्या आदीका वारिंगे यांनी रवींद्र महाजनी यांना मंगळवारी म्हणजे मृत्युच्या आधी ३ दिवस शेवटचं पाहिलं होतं. आदिका कचरा गोळा करण्यासाठी नेहमी यायच्या.
तेव्हा रवींद्र महाजनी त्यांच्याशी बोलायचे आणि विचारपुस करायचे. मंगळवारी त्या कचरा घेण्यासाठी आल्या तेव्हा रवींद्र महाजनी यांनी कचरा त्यांच्या हातात दिला होता. पण मंगळवार नंतर त्यांची भेट झाली नाही, असं आदीका यांनी सांगितलं.
अभिनेते रवींद्र महाजनी यांचा जन्म बेळगावमध्ये झाला, त्यानंतर त्यांचं बालपण हे मुंबईत गेलं. त्यानंतर पुढे रवींद्र महाजनी यांनी व्ही. शांताराम-दिग्दर्शित झुंज या मराठी चित्रपटाद्वारे चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले.
तसेच त्यांनी भूमिका साकारलेले लक्ष्मी ( १९७८), दुनिया करी सलाम (१९७९), गोंधळात गोंधळ (१९८१), मुंबईचा फौजदार (१९८५) हे चित्रपट विशेष गाजले. त्यांनी प्रामुख्याने मराठी, हिंदी व गुजराती चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.