Heeramandi Teaser Out Sanjay Leela Bhansali : आपल्या आगळ्या वेगळ्या धाटणीच्या दिग्दर्शनासाठी ओळखल्या जाणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये संजय लीला भन्साळींचे नाव घ्यावे लागेल. गेल्या काही वर्षात भन्साळींनी त्यांच्या चित्रपटांनी प्रेक्षकांना मोहित केले आहे. त्यात प्रामुख्यानं उल्लेख करायचा झाल्यास देवदास, पद्मावत, बाजीराव मस्तानी. आणि आता भन्साळींचा हीरामंडी नावाचा चित्रपट चर्चेत आला आहे.
हीरामंडी द डायमंड बाजारचा टीझर आता प्रदर्शित झाला असून त्याला नेटकऱ्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या वर्षी त्याचा फर्स्ट लूक समोर आला होता. त्यावेळी त्यातील अभिनेत्री आणि त्यांचा लूक पाहून चाहते भारावून गेले होते. खासकरुन मनीषा कोईराला, रिचा चढ्ढा, सोनाक्षी सिन्हा यांच्या लूकवर चाहते फिदा झाले होते.
प्रेम, सत्ता आणि स्वातंत्र्य यांची गोष्ट सांगणारा चित्रपट म्हणून हीरामंडीकडे पाहिले जात आहे. भन्साळी यांचे चित्रपट, त्याची कथा, त्याचे सादरीकरण, त्याचे निर्मिती मुल्य, छायादिग्दर्शन आणि सेट, त्याची भव्यता हे कायमच चर्चेचा विषय राहिले आहेत. त्यामुळे भन्साळी यांचे चित्रपट थिएटरमध्ये पाहणे हा एक वेगळा अनुभव असतो. आता आगामी काळात त्यांच्या हीरामंडी नावाच्या चित्रपटाचे वेध लागले आहेत.
हीरामंडी ही एका वेगळ्या विषयावर भाष्य करणारी सीरिज असल्याचे बोलले जात आहेत. त्याची चाहते बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. हीरामंडी द डायमंड बाजार मधून भन्साळी हे ओटीटी विश्वात पदार्पण करणार आहेत. आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या टीझरमध्ये आदिती राव हैदरी, मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, रिचा चढ्ढा या अभिनेत्री दिसत आहेत.
हीरामंडीची स्टोरी आहे तरी काय?
भन्साळी हे त्यांच्या हीरामंडीमधून हीरामंडीमध्ये राहणाऱ्या गणिकांची कथा सांगणार आहे. त्यातून त्यांनी प्रेम, सत्ता आणि स्वातंत्र्य या गोष्टींना फोकस केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ही सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असून अद्याप त्याच्या रिलिज डेटविषयी कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. (Know the story of Hiramandi)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.