Helen Birthday: हेलन बॉलिवूडची पहिली आयटम गर्ल झाली.. पण हा स्ट्रगल सोप्पा नव्हता..

बॉलीवुडला वेड लावणारी अभिनेत्री अभिनेत्री 'हेलन'चा आज वाढदिवस, त्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांची स्ट्रगल स्टोरी..
Helen Birthday bollywood first item girl helen success and struggle story personal life husband lifestyle
Helen Birthday bollywood first item girl helen success and struggle story personal life husband lifestyle sakal
Updated on

Helen Birthday: "मोनिका... ओ माय डार्लिंग..'' या गाण्याचे बोलही जरी कानावर आले तरी डोळ्यांसमोर उभी राहते ती एक देखणी, बोल्ड तरुणी अर्थात अभिनेत्री हेलन. अभिनेत्री हेलन यांनी ५० आणि ६० च्या दशकात आपल्या आयटम साँग्सने खळबळ उडवून दिली होती. लोक त्यांचा डान्स पाहायला अक्षरशः वेडे होते. आज अभिनेत्री हेलन यांचा ८५ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने जाणून घेऊया एक त्यांच्या आयुष्यातील काही खास किस्से..

Helen Birthday bollywood first item girl helen success and struggle story personal life husband lifestyle
Bigg Boss Marathi 4: किरण माने घराबाहेर, पण खेळ सुरूच.. दिली स्पेशल पावर..

२१ नोव्हेंबर १९३८ रोजी म्यानमार बर्मामध्ये जन्मलेल्या हेलन यांचे आयुष्य संघर्षांनी भरलेले होते. हेलन यांच्यासाठी हा प्रवास कठीण होता. हेलन या मूळच्या म्यानमार बर्माच्या आहेत. त्या अँग्लो इंडियन कुटुंबातील आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर हेलनच्या आईने एका ब्रिटिश सैनिकाशी लग्न केले. पण दुसऱ्या महायुद्धात त्यांचाही मृत्यू झाला. त्यानंतर हेलन आईसह मुंबईला आल्या.

Helen Birthday bollywood first item girl helen success and struggle story personal life husband lifestyle
Hemant Dhome: लोक तिकीटं काढतायत आणि शो कॅन्सल होतायत.. हेमंत ढोमे संतापला..

त्यावेळी हेलन केवळ 3 वर्षांच्या होत्या. अत्यंत हलकीच्या परिस्थितीतून त्या मोठ्या झाल्या. उदरनिर्वाहासाठी हेलन यांनी चित्रपटामध्ये कोरस डान्सर म्हणून काम सुरू केले. हेलनला १९५१ च्या 'शबिस्तान और आवारा' चित्रपटात कोरस डान्सर म्हणून पहिल्यांदा काम मिळाले. परंतु त्यावेळी गर्दीत नाचणाऱ्या हेलनकडे दुर्लक्ष झाले. अनेक महिने गर्दीत उभे राहून नृत्य केल्यानंतर, हेलन यांना स्वतःची अशी ओळख मिळू लागली. त्यांनंतर 1954 मध्ये आलेला 'अलीफ लैला' आणि 1955 मध्ये आलेल्या 'हुर-ए-अरब' सारख्या चित्रपटांमध्ये त्या ग्रुप डान्स मध्ये दिसल्या.

हेलननला खरी प्रसिद्धी मिळाली ती ‘हावडा ब्रिज’ या चित्रपटातील "मेरा नाम चुन‌चुन" आयटम साँगने . त्यानंतर हेलन बॉलिवूडची पहिल्या आयटम गर्ल बनल्या. भले हेलन यांनी मोजक्याच चित्रपटांमध्ये अभिनय केला पण त्यांना चित्रपटात आयटम डान्स साठी मागणी जास्त होती. त्यावेळी हेलनचा डान्स बघाण्यासाठी लोक आवर्जून चित्रपट पाहायला जात असे.

वैवाहिक आयुष्याबद्दल सांगायचे तर, हेलन यांनी आपल्यापेक्षा २८ वर्षांनी मोठे दिग्दर्शक पीएन अरोरासोबत लग्न केले होते, पण लग्नाच्या १८ वर्षानंतर १९७४ मध्ये हेलन यांनी पती पीएन अरोरा यांना घटस्फोट दिला. हेलन यांची आर्थिक फसवणूक झाल्याने त्यांनी घटस्फोट घेतला .

‘काबिल खान’ या चित्रपटादरम्यान हेलन यांची सलीम खान यांच्याशी भेट झाली. बॉलिवूडमध्ये सुरुवातीच्या दिवसांपासून हेलन आपल्या सौंदर्याने लोकांना वेड लावत होत्या. मात्र, सलीम खान त्यांच्या नृत्यावर देखील भाळले आणि पहिले लग्न झाले असूनही सलीम यांनी हेलन यांच्याशी लग्न केले. सलीम यांचेही पहिले लग्न झाले होते आणि आता हेलन या हेलन खान नावाने ओळखला जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.