Hema Malini : कोणत्या वादात अडकल्या होत्या हेमा मालिनी? RTI मधून झाला होता मोठा खुलासा!

प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini Latest news) यांच्याविषयी वेगळ्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
Hema Malini Latest news
Hema Malini Latest newsesakal
Updated on

Hema Malini Land Grabbing Charge : बॉलीवूडची ड्रीम गर्ल म्हणून लोकप्रिय असणाऱ्या हेमा मालिनी यांच्याविषयीचा एक वाद समोर आला आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी त्यांच्या डान्स अॅकडमीसाठी जी जमीन खरेदी केली होती. त्याच्या विक्रीतील मोठ्या फरकासंबंधीचा तो वाद होता.

आपल्या सौंदर्यानं आणि अभियनानं चाहत्यांना चार दशकांहून अधिक काळ भुरळ घालणाऱ्या हेमा मालिनी यांचा चाहतावर्ग मोठा आहे. त्या बॉलीवूड बरोबरच राजकीय क्षेत्रातही सक्रिय असल्याचे दिसून आले आहे. त्या बीजेपी पक्षाच्या खासदार असून सध्या त्यांच्या वरुन एक मोठा वाद पुन्हा समोर आला आहे. खरं तर बऱ्याच वर्षांपूर्वीचे हे प्रकरण पुन्हा एकदा समोर आले आहे. रटीआय़ कार्यकर्ता अनिल गलगली यांनी ती धक्कादायक माहिती समोर आणली होती. तो वाद बराच काळ चर्चेत होता. हे प्रकरण २०१६ मधील आहे.

आरटीआयच्या त्या माहितीनुसार, हेमा मालिनी यांच्या डान्स अॅकडमीसाठी सरकारकडून २ हजार स्क्वेअर मीटरची जागा केवळ ८७.५० प्रति स्क्वेअर मीटर या दरानं उपलब्ध करुन देण्यात आली होती. इंडियन एक्सप्रेसनं याबाबत सविस्तर वृत्त दिलं होतं. त्या जागेचे सध्याच्या मार्केटनुसार मूल्य हे ७० कोटींचे असून हेमा मालिनी यांना ती जमीन फक्त पावणे दोन लाख रुपयांना मिळाल्याचे त्या माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीतून दिसून आले होते.

हेमा मालिनी यांच्या मुंबईतील ओशिवरा येथील डान्स अॅकडमीची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. त्या संदर्भात आरटीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार त्या जागेची खरी किंमत आणि त्यासाठी प्रत्यक्षातील किंमत यातील फरक समोर आला होता.

Hema Malini Latest news
Poonam Pandey : मंदिरात देवदर्शनाला गेली, मृत्यूच्या बातमीनंतर पूनम पहिल्यांदाच दिसली!

अनिल यांनी त्या जमिनीच्या व्यवहाराबाबत आरटीआयमधून माहिती मिळावी यासाठी अर्ज केला होता. त्यावेळी मिळालेल्या माहितीतून ३५ रुपये प्रती स्क्वेअर मीटर या दरानं त्यांना ती जमीन देण्यात आली होती. या प्रकरणाची चर्चा झाल्यानंतर त्यांना शासकीय आदेशानुसार पुन्हा वेगळ्या दरानं ती जमीन देण्यात आल्याचे दिसून आले होते.

हेमा मालिनी या बॉलीवूडमधील प्रसिद्ध भरतनाट्यम नर्तिका म्हणून लोकप्रिय आहेत. त्यांनी या जमिनीच्या व्यवहारासाठी दहा लाख रुपये अॅडव्हान्स दिले होते. त्यांना त्यावेळी सरकारनं उरलेले ८.२५ लाख रुपये परत केल्याचे त्या आऱटीआयमधून समोर आल्याचे गलगली यांनी सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.