Hemangi Kavi: आपली मनमानी करून चालत नाही, दिवाळीनिमित्त हेमांगी कवीची खास पोस्ट व्हायरल

हेमांगी कवीने दिवाळीनिमित्त केलेल्या पोस्टची चर्चा रंगलीय
hemangi kavi post on diwali 2023 viral on social media
hemangi kavi post on diwali 2023 viral on social media SAKAL
Updated on

Hemangi Kavi on Diwali: दिवाळीच्या सणाला उत्साहात सुरुवात झालीय. घरोघरी कुटुंबातील प्रत्येक सदस्य दीपावली जल्लोषात साजरी करत आहे. कुठे गोडधोडाचा फराळ, तर कुठे दिव्यांची रोषणाई पाहायला मिळते.

अशातच मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवीने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केलीय. हेमांगीने खास फोटो पोस्ट करुन तिच्या मनातल्या भावना व्यक्त केल्यात.

hemangi kavi post on diwali 2023 viral on social media
Diwali 2023: "जे मला उपदेशाचे डोस पाजतील त्यांना..." मराठी अभिनेत्रीने केले फटाके न फोडण्याचं आवाहन

हेमांगी लिहीते, "दरवर्षी प्रमाणे यंदाही! मला आठवतंय दुकानात, बाजारात जाऊन ‘कंदील’ निवडायची जबाबदारी मला जेव्हापासून कळायला लागलं तेव्हा पासून देण्यात आली किंवा मी ती स्वतः घेतली कारण रंगांचं ज्ञान इतरांपेक्षा टीचभर जरा बरं म्हणून. पण मग तेव्हापासून ही रीतच झाली दरवर्षी वेळात वेळ काढून मी कंदील खरेदी करायला जाते म्हणजे जातेच."

हेमांगी पुढे लिहीते, "खूप भारी वाटतं निरनिरळ्या पद्धतीचे कंदील पाहून!
प्रत्येकाला वाटतं सगळ्यांपेक्षा वेगळा आणि हटके कंदील आपल्या दारात, खिडकीत आसावा! खरंतर कंदील इकडून तिकडून सारखेच पण आपण निवडलेला कंदील हा आपल्या पुरता का होईना special च असतो! पण मग इतक्या सर्व options मधून तो ‘एक’ कंदील निवडणं काय सोप्पं काम नसतं गड्या! लय कटीन!"

हेमांगी पुढे लिहीते, "म्हणजे मी एखादी साडी पटकन निवडेन पण कंदील निवडणं is altogether different game भाई. कारण ही गोष्ट अशीय ना की ती घरातल्या प्रत्येकाला आवडायला हवी, आपली मनमानी करून चालत नाही! मला वाटलं म्हणून मी आणला असं करून नाही चालत. तर घरातल्या प्रत्येकाच्या आवडी-निवडीचा विचार करून आणावा लागतो! निदान मी तरी असं करते! मज्जा असते सगळी!
तुम्ही करता का असं?"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.