Ganesh Chaturthi 2023: बाप्पाचं जानवं, उपरणं, धोतर, शेंडी.. गणेशोत्सवानिमित्त हेमांगीची पोस्ट चर्चेत

Hemangi Kavi Post On  Ganesh Chaturthi 2023 share photo
Hemangi Kavi Post On Ganesh Chaturthi 2023 share photo Esakal
Updated on

Hemangi Kavi post on Ganesh Chaturthi News:  आज सर्वत्र गणेशोत्सवाची धुम आहे. सर्वसामान्यांसोबतच सेलिब्रिटीही हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतांना दिसताय. काहींनी बाप्पाची मुर्ती घरीच बनवली तर काहींनी त्यांची खास आठवण शेयर केली आहे.

मराठी मनोरंजन सृष्टीतील कलाकारांनीही वेगवेगळ्या संदेशांसह गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या. त्यातच मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी हिने देखील तिच्या बालपणाची एक खास आठवण शेयर केली आहे.

गणरायाचा एक फोटो हेमांगीने शेयर केला आहे आणि तिने या फोटोला एक लांबलचक कॅप्शन देखील दिलं आहे. यात फोटोत तिने ती दुसरीत असतांना काढलेल्या एक चित्र शेयर केल आहे.

Hemangi Kavi Post On  Ganesh Chaturthi 2023 share photo
BTS Suga: "मी जिंवत..," BTS ग्रुपच्या सुगानं संगीत जगताला ठोकला रामराम! आता देशासाठी...

या फोटोच्या कॅप्शनमध्ये ती लिहिते की, 'श्रीगणेशचतुर्थीच्या सर्वांना खूप शुभेच्छा

मी दुसरीत असताना एका चित्रकला स्पर्धेत काढलेलं

“गम्पती बाप्पा” चं चित्लं!

यासाठी मला बक्षीस मिळालं होतं. आयुष्यातलं पहीलं बक्षीस! परीक्षकांनी या चित्राला बक्षीस देण्याचं कारण ही आवर्जून सांगितलं. ते म्हणाले चित्र म्हणून हे तेवढं छान नसलं तरी चित्रकलेला लागणारी निरीक्षण शक्ती अफाट आहे. एखाद्याने नुसतंच गणपतीचं चित्र काढलं असतं पण हीने भटजी बुवा (त्याचं detailing- जानवं, उपरणं, धोतर, शेंडी, मागे तंबोरा घेऊन बसलेली मुलगी (ती माझी ताई आहे कारण ताई गाण्याच्या class जायची आणि गणपतीत ती तिच्या सरांना साथ द्यायची), तबला वाजवणारा मुलगा (ताईच्या class मधला), उंदीरमामा, अगरबत्ती, नेवैद्य, मोदक या सर्व गोष्टींसाठी बक्षीस देतोय. तेव्हाच्या प्रथेप्रमाणे दुसऱ्या दिवशी शाळेत प्रत्येक वर्गात जाऊन मिळालेलं बक्षीस दाखवताना काय shining वाटली होती काय सांगू!त्यांच्या या कौतुकामुळे मला प्रोत्साहन मिळालं. तेव्हाच मी चित्रकार व्हायचं ठरवून टाकलं आणि झालेही!'

Hemangi Kavi Post On  Ganesh Chaturthi 2023 share photo
Kranti Redkar: "आमच्या घरी गणपती बसत नाही..", क्रांती रेडकरने शेयर केला जुळ्या लेकींचा व्हिडिओ..होताय व्हायरल..

पुढे ती लिहिते की, 'गणपती म्हणजे कलेची देवता. पुढे याच कलेच्या देवतेने मला अभिनय क्षेत्रात आणलं आणि माझ्या अभिनय क्षेत्रातला श्रीगणेशा झाला!'

या पोस्टबरोबरच तिने तिला ट्रोल करणाऱ्यांनादेखील आधीच टोमणा मारला आहे. यात ती म्हणते की, 'हीला एवढं लहानपणीचं कसं काय आठवतं बरं असं जर मंडाळातील काही सदस्यांना वाटलं तर हो गणपतीचा वरदहस्त माझ्यावर आहे आणि हत्ती या प्रजाती सारखीच माझी ही memory strong आहे! म्हणून नाटकातले संवाद आम्हांला पाठ होतात!'

Hemangi Kavi Post On  Ganesh Chaturthi 2023 share photo
Kartik Aryan: लालबाग राजाच्या चरणी कार्तिक आर्यन नतमस्तक, बाप्पाचं घेतलं दर्शन

हेमांगी कवी ही सोशल मीडियावर खुप सक्रिय असते. ती नेहमी काही ना काही पोस्ट शेयर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. तिचे चाहते तिच्या या पोस्टचं कौतूक करताय आणि तिला देखील गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.