Hemangi kavi: 'मासिक पाळी असताना देवळात..', हेमांगीच्या पोस्टनं वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष...

मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी ही नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते.

Hemangi kavi:
Hemangi kavi:Esakal
Updated on

मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी ही नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते.

सोशल मिडियाच्या माध्यमातुन ती अनेक विषयांवर भाष्य करत असते. रोखठोकपणे आणि बिनधास्तपणे ती सोशल मिडियावर तिचं मत मांडत असते.

तिच्या या पोस्ट काहींना आवडतात तर काहींना त्या पटत नाही. त्यामुळे हेमांगीला ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो.


Hemangi kavi:
Adah Sharma: केरळ स्टोरीच्या अदानं घेतला मोठा निर्णय! चाहत्यांना बसला धक्का...

असं काहीस यावेळीही झालं आहे. हेमांगी कवीने नुकतचं फेसबुकवर एक पोस्ट शेयर केली आहे. ज्यात तिनं मासिक पाळीबद्दल भाष्य केलं आहे. मासिक पाळीबद्दल आपल्या समाजात अनेक समज गैरसमजदेखील आहेत.

अशीच एक पोस्ट सोशल मिडियावर एका महिला युजर्सने शेयर केली आहे. ज्यात तिने मासिक पाळीच्या वेळी देवळात का जाऊ नये याची ' वैज्ञानिक कारणं सांगणाऱ्या लोकांना चांगलचं सुनावलं होतं.

त्यात महिलांना मासिक पाळीच्या दिवसात काय समस्या येतात आणि देवळात गेल्याने महिलांच्या शरिरावर काय परिणाम होतो याबाबत अनेक दावे तिनं खोडून काढले होते.


Hemangi kavi:
Rashmika Mandanna Marriage: रश्मिका मंदानाने उरकलं गुपचूप लग्न? त्याचं नाव ऐकून बसेल धक्का!

आता त्या महिलेची पोस्ट शेयर करत हेमांगीनं देखील तिचं कौतुक केलं आणि पोस्टमध्ये लिहिलं की, "खुप महत्त्वाचं! मासिक पाळी असताना देवळात जावंसं वाटतं जा! नाही वाटत? नका जाऊ! पण मग या सगळ्यात विज्ञानाची माती करू नका!"

आता तिची ही पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. तिच्या पोस्टवर अनेकांनी नकारात्मक कमेंट केल्या आहेत. मात्र हेमांगीनंही त्यांना चांगलच सुनावलं आहे. तर काहींनी तिचं कौतुक करत पाठिंबा दिला आहे.


Hemangi kavi:
Bigg Boss OTT 2 Eviction: शॉकिंग डबल एविक्शन! बिग बॉसच्या घरातुन 'हे' दोन स्पर्धक जाणार बाहेर....

यापुर्वी देखील हेमांगीनं मासिक पाळीबद्दल भाष्य केलं आहे. त्यात हेमांगीने सांगितलं की, तिच्या घरी मासिक पाळी पाळली जात नाही. तिच्या घरी याबद्दल कसं वातावरण आहे याबद्दलही ती बोलली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.