Hemangi Kavi: मी त्यादिवशी उपाशी राहिले होते, हेमांगी कवीने सांगीतली लहानपणीची विशेष आठवण

हेमांगीने बालपणीचा फोटो शेअर करत खास आठवण सांगीतलीय
hemangi kavi shared her childhood photos and write special post on instagram marathi actress
hemangi kavi shared her childhood photos and write special post on instagram marathi actressSAKAL
Updated on

Hemangi Kavi News: मराठी अभिनेत्री हेमांगी कवी सोशल मिडीयावर कायम चर्चेत असते. हेमांगी सोशल मिडीयावर सक्रिय असते. हेमांगी तिच्या फेसबुक, इन्स्टाग्रामवर बालपणीच्या आठवणी शेअर करताना दिसते.

हेमांगीने नुकतंच सोशल मिडीयावर एक खास पोस्ट केलीय. या पोस्ट मध्ये हेमांगीने तिच्या फॅमिलीचा फोटो शेअर केलाय. या फोटोसोबत हेमांगीने अशी आठवण शेअर केलीय जी वाचुन सर्वजण बालपणीच्या आठवणीत रमतील.

(hemangi kavi shared her childhood photos)

hemangi kavi shared her childhood photos and write special post on instagram marathi actress
शरद पोंक्षे 'आरक्षणावर' घसरले नेटकऱ्यांनी वाजवले, लेक पायलट झाल्यावर केलेल्या पोस्टवरुन नेटकऱ्यांचा संताप| Sharad Ponkshe

हेमांगी फॅमिलीचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो पोस्ट करुन लिहीते, हा आमचा Family photo!
माझे आई, बाबा, भाऊ, बहीण आणि मी! पण तुम्हांला यात चारच माणसं दिसताएत ना! अंहं, मी धरून पाच आहेत! मी खरंच आहे या photo त.

लहान असताना आपण सगळ्यांनीच आपल्या आई- बाबांच्या लग्नात आपण का नव्हतो किंवा मी कुठे होतो/होते photo काढताना असे लाज आणणारे प्रश्न चार चौघात विचारून आपल्या घरच्यांना हैराण केलेलं आहे.

हेमांगी पुढे लिहीते, पुर्वी घरात आलेल्या पाहुण्यांना, नातेवाईकांना आपले photos/ album दाखवायची पद्धत बहुतांश घरात होती. आता हे ऐकताना odd वाटत असलं तरी ही पद्धत किंवा सवय म्हणूया Social Media वर आपण अबाधित ठेवलीए!

तेव्हा त्या चार लोकांसमोर आपल्या पालकांची ‘आता हे कसं समजावयचं?’ झालेली नाजूक परिस्थिती आपल्याला ‘कळायला’ लागल्यावर लक्षात येते आणि ते आठवून आताही हसायला येतं!

आपल्या मोठ्या भावंडांनी आपण कसे रस्त्यावरच सापडलो आणि घरी घेऊन आलो किंवा बोहारणीकडून कसं एका साडीवर घेतलं असं सांगून त्रास दिलेला आहे!मी पण या सगळ्याला अपवाद नाही.

हेमांगी पुढे लिहीते, मी या फोटोत नसण्याचं कारण विचारल्यावर माझ्या दादा-ताईने प्रथेप्रमाणे वरचीच टेप लावली! तेव्हा एवढं वाईट वाटलं होतं ना, माझी आई सांगते मी त्यादिवशी उपाशी राहीले होते!

मग मी जेवावं म्हणून माझ्या आईने मला सांगितलं की मी तिच्या पोटात होते! हा फोटो काढत असताना ती चार महीन्याची गरोदर होती. आपण प्रत्यक्षपणे नसलो तरी वेगळ्या जगात अस्तिवात होतो! आयला म्हणजे आपण सुद्धा आहोत की या फोटोत! केवढा तो आनंद!

आता हे खरं होतं की खोटं माहीत नाही. पण माझ्या बालबुद्धीला पटेल अशी story सांगून माझ्या आईने मी त्यांचीच मुलगी आहे याची खात्री दिली आणि तु पण होतीस या photo मध्ये सांगून आपलेपणाची मुळं कायमची घट्ट पेरली!

आपल्याला कुणीतरी धरून आहे प्रत्यक्ष अप्रत्क्षपणे ही Feeling किती कमाल असते नाई? माझ्यासाठी हाच माझा Do Gubbare Moment आहे! तुमच्या आयुष्यात सुद्धा असे अनेक क्षण असतील ना? किंवा एखादा फोटो?

हेमांगीची भुमिका असलेला दो गुब्बारे सिनेमा JIO CINEMAS OTT वर रिलीज झालाय. या सिनेमात मोहन आगाशे प्रमुख भुमिकेत आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.