hemangi kavi : हेमांगी कवी हे मराठी मनोरंजन विश्वातील एक महत्वाचं नाव. अनेक मालिका, चित्रपट, नाटक तिच्या कसदार अभिनयाने गाजले आहेत. अभिनयासोबतच निरनिराळ्या कारणाने ती चर्चेत असते. विशेष म्हणजे अभिव्यक्तीच्या आधारावर अत्यंत परखडपणे आपले पुरोगामी विचार लोकांपर्यंत पोहचवत असते. त्यामुळे ती कायमच सोशल मीडियावर आपल्याला सक्रिय दिसते. शिवाय समाज माध्यमातून ती आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते. कधी मनमुराद नाच करते तर कधी गमतीशीर व्हिडीओ करते. यंदा मात्र तिने वटपौर्णिमा सणाविषयी भाष्य केले आहे. तुम्ही वटपौर्णिमेचा उपवास करता का हे कलाकारांना आवर्जून विचारलं जातं, या प्रश्नावर तिने सणसणीत उत्तर दिले आहे.
हेमांगी कवी कायमच आपले विचार निर्भीडपणे मांडत असते. बऱ्याचदा यातून मतभेदही होत असतात. यंदा तिने एका संवेदनशील विषयाला हात घातला आहे. आपल्याकडे पतीसाठी स्त्रिया वटपौर्णिमेचा उपवास करतात. वडाच्या झाडाला फेऱ्या मारतात. सावित्रीने पतीला दीर्घायुष्य मिळावे यासाठी हा उपवास केला होता, अशी आख्यायिका आहे. पण आताच्या काळात प्रत्येक महिलेला हा उपवास करणे शक्य असेलच असे नाही. त्यात घरकाम, नोकरी बघून यांचा भर महिलांवर असतो. शिवाय प्रथेमागचा विचार समजून घेणे गरजेचे आहे. अशीच एक पोस्ट हेमांगीने लिहिली आहे.
हेमांगी म्हणते, साता जन्माच्या गोष्टी! नवऱ्यासाठी निर्जळी उपवास करण्यापेक्षा त्याच्या नाकी नऊ न आणणं हे जास्त महत्वाचं आणि फलदायी व्रत आहे कुठल्याही बायकोसाठी!
वडाची फांदी तोडून घरी आणून पुजण्यापेक्षा किंवा वडाच्या झाडाला दोरा गुंडाळण्यापेक्षा आपल्या नवऱ्याच्या नावाचं झाड प्रत्येक वर्षी लावलं तर फक्त त्याचंच नाही तर आपलं ही आयुष्य वाढेल कदाचित! काय?' पुढे ती तळटीप देऊन म्हणते...
त. टी. : यात कुणाच्या ही धार्मिक भावना दुखवायच्या नाहीयेत.
उपवास करायची ज्याची त्याची इच्छा आणि श्रद्धा!
तरीही त्यातून जर कुणी "म्याडम तुमी उपास धरला काय" विचाणाऱ्यांना वाळलेला फणस मिळो! ' अशी पोस्ट हेमांगीने शेअर केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.