Hemangi Kavi: गाव नसणं म्हणजे आई- वडील नसण्यासारखं.. गावच्या घरचा फोटो शेयर करत हेमांगी कवीची भावूक पोस्ट..

हेमांगी कवीची पोस्ट ठरतेय चर्चेचा विषय..
Hemangi Kavi shared post about village native place from mhaswad satara
Hemangi Kavi shared post about village native place from mhaswad satarasakal
Updated on

hemangi kavi : हेमांगी कवी हे मराठी मनोरंजन विश्वातील एक महत्वाचं नावं आहे. अनेक मालिका, चित्रपट, नाटकात तिने तिच्या अभिनयाची छाप सोडली आहे. अभिनयासोबतच निरनिराळ्या कारणाने ती चर्चेत असते.

ती अत्यंत परखडपणे आपले पुरोगामी विचार लोकांपर्यंत पोहचवत असते. प्रत्येक विषयावर आपलं रोखठोक मत ती मांडत असते. ती सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सतत काहीना काही पोस्ट करत असते, रील टाकत असते.

एवढेच नाही तर हेमांगीला ग्रामीण जीवनाची प्रचंड ओढ आहे. तिने आजवर बऱ्याचदा ग्रामीण जीवनाविषयी लिहिलं आहे. अगदी म्हसवडच्या यात्रेतही ती सहभागी झाली होती.

आज त्याच गावाविषयी तिने एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.

(Hemangi Kavi shared post about village native place from mhaswad satara)

Hemangi Kavi shared post about village native place from mhaswad satara
Karan Johar: 'K' वरून नाव ठेवलं म्हणजे चित्रपट चालणारच! या भ्रमात होता करण जोहर.. पण याच अंधश्रद्धेनं..

हेमांगी मुळची सातारा जिल्ह्यातील म्हसवड गावची. या गावाविषयी तिला प्रचंड ओढ आहे. जसं आपली नाळ आपल्या गावाशी घट्ट जोडलेली असते तसंच तिलाही गावात रमायला खूप आवडतं.

सध्या ती आपल्या गावी म्हणजेच म्हसवड मध्ये गेली आहे. दरवर्षी ती उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये गावी जातेच. आज त्याच गावच्या घरासोबत एक फोटो पोस्ट करत हेमांगी लिहिते की, ''आज जगात, देशाबाहेर किती ही फिरलो तरी गावची सर कुठेही नाही. शाळेत असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत २ महिने मुक्काम असायचा.''

''आता कामामुळे शक्य होत नसलं तरी २ दिवस का होईना गावाला जातेच. म्हणजे मी वरचेवर गावाला येत असते पण उन्हाळ्याच्या सुट्टीची बात ही अलग है!''

Hemangi Kavi shared post about village native place from mhaswad satara
Kunal Kemmu Birthday: प्रेमासाठी कुणालनं करपलेलं जेवणही खाल्लं.. अशी आहे कुणाल-सोहाची लव्हस्टोरी..

''जेव्हा मला कुणी सांगतं की त्यांना गावच नाही तेव्हा मला कसंसच होतं. लहानपणी प्रश्न पडायचा असं कसं? गावच नाही? पण नसतं! ठिके! मग मी त्यांना आमच्या गावाला यायचं आग्रहाचं आमंत्रण देते! काही जण येऊन- राहून गेलेत. आता त्यांनाही गाव आहे. सांगायला गावच्या आठवणी आहेत.''


''गाव नसणं म्हणजे आई- वडील नसण्यासारखं वाटतं मला. मी खरंच भाग्यवान, ‘गाव’ नावाची संपत्ती आहे माझ्याकडे!''अशा शब्दात तिने आपल्या गावाविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.